राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ऐतिहासिक उत्तर कोरिया भेटीनंतर अमेरिका, उत्तर कोरिया अणुचर्चा सुरू होणार

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ऐतिहासिक उत्तर कोरिया भेटीनंतर अमेरिका, उत्तर कोरिया अणुचर्चा सुरू होणार

वॉशिंग्टन/प्योनगँग – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दोन्ही कोरियन देशांमधील सीमारेषा ओलांडून उत्तर कोरियात प्रवेश केला आणि हुकूमशहा ‘किम जाँग-उन’ यांची भेट घेतली. उत्तर कोरियन हुकूमशहा किम यांच्याबरोबर आपली चांगली मैत्री असल्याचे सांगून सध्या फारच चांगल्या व सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे ट्रम्प म्हणाले. अमेरिका व उत्तर कोरियन राष्ट्रप्रमुखांच्या या भेटीनंतर, पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये रखडलेली अणुचर्चा पुन्हा सुरू होईल, असे उत्तर कोरियाने जाहीर केले.

अणुचर्चा, तणाव, DMZ border, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, दौरा, दक्षिण कोरिया

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेवर नाराजी व्यक्त करून उत्तर कोरियाने अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा इशारा दिला होता. अशा परिस्थितीत रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाचा दौरा केला. दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या भेटीनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन्ही कोरियन देशांमधील ‘डिमिलिटराईज्ड झोन’ला (डीएमझेड) भेट देण्याचे आणि उत्तर कोरियन हुकूमशहा यांच्याबरोबर चर्चा करण्याचे जाहीर केले.

अणुचर्चा, तणाव, DMZ border, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, दौरा, दक्षिण कोरिया

अचानक ठरलेल्या या भेटीचे आमंत्रण स्वीकारून उत्तर कोरियन हुकूमशहा किम यांनी ‘डीएमझेड’ सीमेवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उत्तर कोरियन सीमारेषेत पाऊल ठेवत, दहा पावले चालत गेले. अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियात जाण्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना ठरत आहे.

 

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info