आर्मेनियन्सचा वंशसंहार घडवून तुर्कीला ऑटोमन साम्राज्याची पुनर्स्थापना करायची आहे – आर्मेनियाच्या पंतप्रधानांचा खळबळजनक आरोप

आर्मेनियन्सचा वंशसंहार घडवून तुर्कीला ऑटोमन साम्राज्याची पुनर्स्थापना करायची आहे – आर्मेनियाच्या पंतप्रधानांचा खळबळजनक आरोप

आर्मेनियन्सचा वंशसंहार

येरेवान/अंकार – ‘तुर्की राजवटीला उत्तरेकडे व पूर्वेला आपला विस्तार करायचा आहे आणि आर्मेनिया त्यातील शेवटचा अडथळा आहे. तो दूर करण्यासाठी आर्मेनियन्सचा वंशसंहार घडवून तुर्की साम्राज्याची पुनर्स्थापना करणे हेच तुर्कीचे मुख्य उद्दिष्ट आहे’, असा खळबळजनक आरोप आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशनियान यांनी केला. आपल्या आरोपांची पुष्टी करताना त्यांनी तुर्कीकडून ग्रीसविरोधात सुरू असलेल्या कारवाया आणि सिरिया व इराकमधील तुर्कीच्या हस्तक्षेपाकडे लक्ष वेधले. दरम्यान, गेले आठवडाभर सुरू असलेल्या आर्मेनिया-अझरबैजान युद्धात ‘नागोर्नो-कॅराबख’मधील आठ गावांवर ताबा मिळविल्याचा दावा अझरबैजानकडून करण्यात आला आहे.

आर्मेनियन्सचा वंशसंहार

गेल्या रविवारपासून मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजानमध्ये जबरदस्त युद्ध भडकले असून दिवसेंदिवस त्याची व्याप्ती अधिकच वाढत चालल्याचे समोर येत आहे. शनिवारी दोन्ही बाजूंनी परस्परांवर मोठ्या प्रमाणात रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे उघड झाले. आर्मेनियाने अझरबैजानमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखाण्यात येणाऱ्या ‘गांजा’मधील हवाईतळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. या तळावरून ‘नागोर्नो-कॅराबख’मधील आर्मेनियान्सच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले होत होते, असे सांगण्यात येते. त्याचवेळी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव्ह यांनी, मदागिझसह सात गावांवर लष्कराने ताबा मिळविल्याचे जाहीर केले. गेल्या २४ तासातील संघर्षात दोन्ही बाजूंची मोठी जीवितहानी झाल्याचे दावे करण्यात येत असून, त्याला दुजोरा मिळालेला नाही.

आर्मेनियन्सचा वंशसंहार

याच पार्श्वभूमीवर आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी तुर्कीवर वंशसंहाराचे आरोप करून खळबळ उडवली आहे. ‘फ्रान्स २४’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी तुर्की आर्मेनिया व ग्रीक बेटे घशात घालण्यात यशस्वी ठरला, तर ते व्हिएन्ना पर्यंत धडकू शकतात, असा इशाराही दिला. ‘नागोर्नो-कॅराबख’मध्ये सुरू असलेल्या युद्धात अझरबैजानला तुर्कीचे संपूर्ण समर्थन असल्याचे व तुर्कीने मोठ्या प्रमाणात शस्त्रे पुरविल्याचा दावा आर्मेनियाने यापूर्वीच केला आहे. आता पंतप्रधान निकोल पाशनियान यांनी तुर्कीवर थेट वंशसंहाराचा आरोप करून सध्या सुरू असलेले युद्ध फक्त ‘नागोर्नो-कॅराबख’पुरते मर्यादित नसल्याची जाणीव करून दिली. तुर्कीच्या कारवायांमुळे संपूर्ण क्षेत्रात विध्वंसाचा भडका उडेल, असेही आर्मेनियन पंतप्रधानांनी बजावले आहे.

गेल्या शतकात पहिल्या महायुद्धादरम्यान, तुर्कीतील तत्कालिन ऑटोमन साम्राज्याने किमान १५ लाख आर्मेनियन लोकांची हत्या घडविली होती. २०व्या शतकातील पहिला मोठा वंशसंहार म्हणून ही घटना ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय समुदायाने सदर घटनेला वंशसंहार म्हणून दिलेली मान्यता तुर्कीने नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर, आर्मेनियन पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांवर तुर्कीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info