अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचे रुपांतर खर्‍या युद्धात होऊ शकते – ब्रिटीश विश्‍लेषकाचा इशारा

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचे रुपांतर खर्‍या युद्धात होऊ शकते – ब्रिटीश विश्‍लेषकाचा इशारा

लंडन – अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचे परिणाम जगातील सर्व अर्थव्यवस्थांवर होणार असून त्यातून खरेखुरे युद्ध भडकण्याची शक्यता आहे, असा इशारा ब्रिटीश विश्‍लेषकांनी दिला आहे. व्यापारयुद्धामुळे अमेरिका व चीनमधील संबंध अधिकाधिक बिघडत चालले असून त्यामुळे चीन ‘साऊथ चायना सी’वर ताबा मिळविण्याच्या योजनेला अधिक गती देईल व त्यातून संघर्ष पेटेल, असे ‘ब्रुनेल युनिव्हर्सिटी’तील प्राध्यापक फ्रान्सेस्को मॉस्कोन यांनी बजावले आहे.

अमेरिका-चीन, व्यापारयुद्ध, प्राध्यापक फ्रान्सेस्को मॉस्कोन, साऊथ चायना सी, संघर्ष, world war 3, लंडन, जॅक मा

ब्रिटीश दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत प्राध्यापक मॉस्कोन यांनी, अमेरिका-चीन व्यापारयुद्धाची पार्श्‍वभूमी स्पष्ट करून प्रत्यक्षातील युद्धाची शक्यता व्यक्त केली. ‘गेली अनेक दशके अमेरिका व चीन या दोन्ही महासत्तांनी जागतिकीकरणाचे फायदे उचलत आपल्या अर्थव्यवस्था मजबूत केल्या. अमेरिका मुक्त व्यापाराला कायम समर्थन देईल, अशी चीनची धारणा होती. तर चीन आर्थिक प्रगतीबरोबरच राजकीय खुलेपणाला प्राधान्य देईल, असा अमेरिकेचा समज होता’, असे ब्रिटीश प्राध्यापकांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.

मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली व्यापारयुद्धाची घोषणा व चीनने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना संपूर्ण जीवनभर नेतृत्व सोपविण्याचा घेतलेला निर्णय यामुळे दोन्ही देशांच्या परस्परांविषयीच्या अपेक्षांना धक्का बसला, असा दावा मॉस्कोन यांनी केला. आता व्यापारयुद्ध अधिकाधिक तीव्र होत असून त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे समोर येत आहे, असे ब्रिटीश प्राध्यापकांनी स्पष्ट केले.

अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्ध तीव्र झाल्याने चीन ‘साऊथ चायना सी’ ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग देईल, असा दावा ब्रिटीश अभ्यासकांनी केला. या हालचालींमधून अमेरिकेचे वर्चस्व संपविण्याचा प्रयत्न चीन करेल व त्यातून युद्ध भडकेल, अशी शक्यता प्राध्यापक मॉस्कोन यांनी वर्तविली आहे.

अमेरिका-चीनमधले व्यापारयुद्ध दोन दशके सुरू राहिल – चिनी उद्योजक जॅक मा यांचा दावा

बीजिंग – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धात ते एखादी लढाई जिंकतीलही, पण पूर्ण युद्ध हरतील, असा इशारा देऊन हे युद्ध किमान दोन दशकांपर्यंत चालू राहिल, असा दावा चिनी उद्योजक ‘जॅक मा’ यांनी केला आहे. त्याचवेळी आपण ट्रम्प यांना दिलेले १० लाख नोकर्‍यांच्या निर्मितीचे वचन आता पूर्ण होऊ शकणार नाही, असेही मा यांनी बजावले.

अमेरिका-चीन, व्यापारयुद्ध, प्राध्यापक फ्रान्सेस्को मॉस्कोन, साऊथ चायना सी, संघर्ष, world war 3, लंडन, जॅक मा

अमेरिका-चीन व्यापारयुद्धात दोन्ही देशांनी आतापर्यंत परस्परांविरोधात तब्बल ३६० अब्ज डॉलर्सच्या व्यापारावर कर लादले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या संपूर्ण ५०० अब्ज डॉलर्सच्या आयतीवर कर लादण्याची धमकीही दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अब्जाधीश चिनी उद्योजक जॅक मा यांनी, हे व्यापारयुद्ध दीर्घकाळपर्यंत सुरू राहिल, असा दावा केला.

 

 

English हिंदी

 

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info