इराणकडून सोन्याचे पाठबळ लाभलेल्या क्रिप्टोकरन्सीची घोषणा

इराणकडून सोन्याचे पाठबळ लाभलेल्या क्रिप्टोकरन्सीची घोषणा

वॉशिंग्टन – १९७९ साली झालेल्या इस्लामी क्रांतीनंतर गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच इराणची अर्थव्यवस्था प्रचंड दडपणाखाली असल्याची कबुली इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी दिली. इराणी अर्थव्यवस्थेच्या या दयनावस्थेसाठी अमेरिका जबाबदार असल्याचा ठपका इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवला. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे संकटात सापडलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी इराणने सोन्यावर आधारित क्रिप्टोकरन्सीची घोषणा केली आहे. इराण ही घोषणा करणार असल्याचे दावे आधीपासून केले जात होते. डॉलरवर आधारलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आव्हान देऊन अमेरिकेच्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने हे पाऊल उचलले आहे. यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटू शकते.

इराणमधील इंग्रजी दैनिकाने ही बातमी प्रसिद्ध केली. सोन्याचे पाठबळ असलेल्या या क्रिप्टोकरन्सीला ‘पेमन’ असे नाव देण्यात आले आहे. इराणी क्रिप्टोकरन्सीच्या उभारण्यासाठी इराणच्या चार प्रमुख बँका व एका खासगी कंपनीने पुढाकार घेतला आहे. यामध्ये ‘पर्शियन बँक’, ‘बँक पासारगाद’, ‘बँक मेल्ली इराण’ आणि ‘बँक मेलत’ यांचा समावेश आहे. तसेच ‘घोघ्नूस कंपनी’नेही क्रिप्टोकरन्सी लाँच करण्यासाठी आघाडी घेतल्याचे इराणी दैनिकाने म्हटले आहे. या चारही बँकांमध्ये येत्या काळात ‘पेमन’ क्रिप्टोकरन्सी उपलब्ध होईल. ‘पेमन’च्या सहाय्याने बँकांमधील संपत्ती आणि अतिरिक्त मालमत्तेचे ‘टोकनायझेशन’ केले जाईल, अशी माहिती ‘घोघ्नूस’चे संचालक वलीओल्लाह फातेमी यांनी दिली.

क्रिप्टोकरन्सीची घोषणा, अमेरिकेच्या निर्बंधांना प्रत्युत्तर, पेमन, आर्थिक व्यवहार, ww3, इराण, EU, इन्स्टेक्स

‘पेमन’चे हे टोकन एखाद्या ‘वॉलेट’ किंवा ‘पेमेंट चॅनल’प्रमाणे काम करील. याद्वारे दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीत तर बँकांचे व्यवहारही गतिमान होतील, असा दावा फातेमी यांनी केला. इराणच्या अर्थव्यवस्थेची गरज पाहता सुरुवातीला बँकांमध्ये तब्बल एक अब्ज ‘पेमेन’ क्रिप्टोकरन्सी उतरविण्यात येईल. बँकांच्या व्यवहारांची घडी बसल्यानंतर इराणी शेअरबाजारातही ‘पेमेन’ला वाव दिला जाईल, असे घोघ्नूस म्हणाले.

अमेरिकी निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर इराण क्रिप्टोकरन्सीची घोषणा करील, असे बोलले जात होते. अमेरिकेने टाकलेल्या निर्बंधांमुळे इराणबरोबर आर्थिक व्यवहार करणे अवघड होऊन बसले होते. त्यात युरोपिय देशांनी सुचविलेल्या ‘स्विफ्ट’ या पर्यायी चलन यंत्रणेवरही अमेरिकेने निर्बंध लादल्यामुळे इराणची परिस्थिती अवघड होऊन बसली होती. त्यामुळे अमेरिकेचे निर्बंध आणि डॉलरला बगल देऊन आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहार सुरू ठेवण्यासाठी इराणने सोन्याचे पाठबळ असलेली ‘पेमेन’ क्रिप्टोकरन्सी बाजारात आणल्याचे बोलले जाते.

दरम्यान, ‘पेमेन’ची घोषणा करण्याच्या आठवडाभरआधी इराणच्या सेंट्रल बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबतचे नियम जाहीर केले होते. या घोषणेबरोबरच इराणने क्रिप्टोकरन्सीच्या लाँचिंगचे संकेत दिले होते.

युरोपिय देशांकडून इराणला ‘इन्स्टेक्स’  

क्रिप्टोकरन्सीची घोषणा, अमेरिकेच्या निर्बंधांना प्रत्युत्तर, पेमन, आर्थिक व्यवहार, ww3, इराण, EU, इन्स्टेक्स

ब्रुसेल्स – फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनने इराणबरोबरच्या आर्थिक व्यवहारांसाठी ‘इन्स्टेक्स’ ही पर्यायी चलन यंत्रणा उभारली आहे. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांना डावलण्यासाठी ‘इन्स्टेक्स’ सहाय्य करील, असा दावा युरोपिय देशांनी केला आहे.

‘इन्स्टेक्स’मुळे युरोपिय देशांचे इराणबरोबरचे व्यापारी सहकार्य पुन्हा कार्यरत होईल, असे बोलले जाते. या पर्यायी चलन यंत्रणेमुळे फक्त अन्न, औषधे आणि रुग्णालयासंबंधी साहित्यांबाबतचे व्यवहार शक्य होतील, असे सांगितले जाते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info