इराण आणि सोरस यांच्यात सहकार्य – इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची माहिती

इराण आणि सोरस यांच्यात सहकार्य – इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची माहिती

तेहरान – युरोपिय देशांमध्ये शिरणार्‍या निर्वासितांचे समर्थक व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक असलेले धनाढ्य गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांच्याशी इराणचे सहकार्य सुरू आहे. इराणच्या संसदेत बोलताना परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी ही माहिती उघड केली. ट्रम्प प्रशासनाने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेण्याची तयारी केल्यानंतर, सोरस यांनी त्याविरोधात ट्रम्प प्रशासनाला इशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेली ही कबुली निराळेच संकेत देत आहे.

सोरस, इशारा, जावेद झरिफ, OSF, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, निर्बंध, सहकार्य, ww3, मीडिया मॅटर्स, अणुकरार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लादलेल्या निर्बंधांचे परिणाम इराणच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागले आहेत. युरोप तसेच जगभरातील मोठ्या कंपन्यांनी इराणबरोबरच्या करारातून माघार घेण्यास सुरुवात केली असून पुढच्या दोन महिन्यात इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठे हादरे बसतील, अशी चिंता इराणमधील विरोधक तसेच विश्‍लेषक करू लागले आहेत. गेल्या आठवड्यात इराणच्या संसदेत विरोधकांनी राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्याकडे याबाबत विचारणा केली होती. विरोधकांच्या या प्रश्‍नांना उत्तर देताना परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी अमेरिकेतील काही प्रभावी व धनाढ्य मंडळी इराणशी जोडलेली असल्याचा दावा केला.

यामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे कडवे विरोधक जॉर्ज सोरस यांच्या नावाचा परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी उल्लेख केला. आपण इराणच्या परराष्ट्रमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्याआधीपासून सोरस हे इराणबरोबर जोडलेले होते, अशी माहिती झरिफ यांनी दिली. सोरस यांची ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन्स’ (ओएसएफ) ही संघटना इराणच्या सरकारबरोबर सहकार्य करीत असल्याचे झरिफ यांनी सांगितले. इराण सरकार व सोरस यांच्या ‘ओएसएफ’ या संघटनेतील हे सहकार्य जुने तसेच अतिशय निकटचे असल्याचा उल्लेखही परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी केला. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात अनेक अडचणी आल्यानंतरही सोरस यांच्या ‘ओएसएफ’बरोबरचे सहकार्य सुरू ठेवण्यात आपल्याला यश मिळाल्याचे झरिफ यांनी म्हटले आहे.

या सहकार्याअंतर्गत सोरस यांच्या ‘ओएसएफ’ने इराणला किती अर्थसहाय्य केले किंवा अन्य कुठल्या प्रकारचे सहाय्य केले, याची माहिती परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी दिली नाही. २०१३ साली इराणमध्ये रोहानी यांचे सुधारणावादी सरकार सत्तेवर आले होते. या सरकारमध्ये झरिफ यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्रीपदाची सूत्रे घेतली होती. त्यामुळे पाच वर्षांपेक्षाही अधिक काळ सोरस यांची ‘ओएसएफ’ ही संघटना इराणशी सहकार्य साधून असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, सोरस हे कडवे ट्रम्प विरोधी म्हणून ओळखले जातात. ट्रम्प हे जागतिक व्यवस्था नष्ट करण्याच्या मार्गावर असल्याची टीका सोरस यांनी तीन महिन्यांपूर्वी केली होती. त्याचबरोबर २०२० सालाआधीच ट्रम्प राष्ट्राध्यक्षपद गमावतील, असे भाकित सोरस यांनी वर्तविले होते. त्याचवेळी सोरस यांच्याशी संलग्न असलेल्या ‘मीडिया मॅटर्स’ या संघटनेने ट्रम्प यांच्याविरोधात सोशल मीडियाचा वापर करण्याची तयारी केल्याच्या वादग्रस्त बातम्या समोर आल्या होत्या. अशा परिस्थितीत, इराण व सोरस यांच्या संघटनेमध्ये प्रस्थापित झालेले सहकार्य आंतरराष्ट्रीय राजकारणातील एका वेगळ्याच प्रवाहाकडे बोट दाखवित आहे.

English  हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info