कोरोनाव्हायरसच्या साथीने चीनच्या वुहानमध्ये जशी स्थिती निर्माण केली होती, तशीच भयंकर परिस्थिती या साथीचा प्रवेश झालेल्या देशांमध्येही निर्माण होईल, असा इशारा चीनच्या तज्ज्ञांनी दिला आहे. २००३ साली आलेल्या सार्सच्या साथीचा सामना करताना, चीनच्या यंत्रणांच्या मर्यादांवर बोट ठेवणारे तज्ज्ञ डॉ. झॉंग नॅन्शॅन यांनी हा दावा केला.
कदाचित एप्रिल महिन्यापर्यंत चीनमधील कोरोनाव्हायरसची साथ संपून जाईल, असा आपला अंदाज असल्याचे डॉ. नॅन्शन यांनी म्हटले आहे. पण चीनच्या बाहेर ही साथ भयंकर प्रमाणात वाढत चालली आहे. ते पाहता या साथीचा जिथून उगम झाला, त्या वुहानमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली, तशीच परिस्थिती इतर देशांवर येऊ शकेल. वेळीच ही साथ रोखली नाही, तर परिस्थिती भयावह बनेल, असा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे.
अजूनही काहीजणांना ही फार मोठी समस्या आहे, असे वाटत नाही. त्यामुळे ते आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने इतर देशांमध्ये प्रवास करीत आहेत, ही चिंतेची बाब ठरते. यामुळे अधिक काटेकोरपणे वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य बनले आहे. सध्या इतकी दक्षता घेतली जात नाही, असा ठपका डॉ. झॉंग नॅन्शॅन यांनी ठेवला आहे.
दरम्यान, चीनचे तज्ज्ञ हा इशारा देत असले तरी चीनने या विषाणूबाबतचे सत्य दडपल्यामुळेच जगावर या साथीचे संकट कोसळले असे आरोप होत आहेत. या आरोपातून आपली सुटका करून घेण्यासाठी चीन हा विषाणू अमेरिकन लष्कराने पसरविल्याचे दावे ठोकू लागला आहे. आता चीनचे तज्ज्ञ या विषाणूच्या जगभरातील फैलावाला बाकीच्या देशांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे सांगून आपल्या देशाला आरोपमुक्त करण्यासाठी धडपडत असल्याचे डॉ. झॉंग नॅन्शॅन यांच्या दाव्यावरून पुन्हा एकदा समोर येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |