इस्रायल-सौदीचा इराण व बायडेन यांना संदेश – इस्रायली व अमेरिकी माध्यमांचा दावा

इस्रायल-सौदीचा इराण व बायडेन यांना संदेश – इस्रायली व अमेरिकी माध्यमांचा दावा

जेरूसलेम – अणुबॉम्ब मिळविण्याच्या जवळ पोहोचलेला इराण आणि इराणबाबत उदार धोरण स्वीकारणारे अमेरिकेेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना सज्जड इशारा देण्यासाठी सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इस्रायली पंतप्रधानांची भेट घेतली. पाश्‍चिमात्य वृत्तसंस्थांनी हा दावा केला आहे. तर इराणच्या विरोधात एकजूट करून आघाडी उभारण्यासाठी सौदीचे क्राऊन प्रिन्स व इस्रायली पंतप्रधानांमध्ये चर्चा पार पडल्याची माहिती, सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्याने एका इस्रायली वर्तमानपत्राला दिली आहे.

बायडेन

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी रविवारी रात्री सौदी अरेबियाचा अघोषित दौरा करून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या भेटीचे वृत्त फेटाळले. पण सौदीच्या राजघराण्यातील सदस्यांनीच पंतप्रधान नेत्यान्याहू आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात निऑम शहरात तासभर चर्चा झाल्याचे माध्यमांना कळविले आहे. इस्रायली सरकार तसेच लष्कराने या भेटीबाबत बोलण्याचे टाळले, पण या भेटीचे वृत्त फेटाळलेले नाही. त्यामुळे इस्रायल व सौदीच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडल्याचे अमेरिकी व इस्रायली माध्यमे ठासून सांगत आहेत.

अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तसंस्थेने पंतप्रधान नेत्यान्याहू आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात झालेली भेट बायडेन यांच्यासाठी संदेश असल्याचा दावा केला आहे. या भेटीआधी इस्रायल तसेच सौदीने इराणबरोबरच्या अणुकरारावरुन अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना दिलेल्या इशाऱ्याकडे अमेरिकी वृत्तसंस्था लक्ष वेधत आहे. बायडेन यांनी इराणबरोबर नव्याने अणुकरार करू नये, असा इशारा इस्रायलने दोन दिवसांपूर्वी दिला होता. तर सौदी देखील इराणविरोधात अणुबॉम्बनिर्मितीचा पर्याय वापरू शकतो, असे सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले होते.

बायडेन

अमेरिकेचे पारंपरिक मित्रदेश असलेल्या इस्रायल व सौदीने दिलेल्या इशाऱ्यानंतरही अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे बायडेन यांना सज्जड इशारा देण्यासाठी इस्रायली पंतप्रधानांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्सची भेट घेतल्याचा दावा अमेरिकी वृत्तसंस्थेने केला.

तीन महिन्यांपूर्वीच इस्रायली पंतप्रधान आणि सौदीच्या क्राऊन प्रिन्सची भेट होणार होती. पण या भेटीची माहिती माध्यमांमध्ये उघड झाल्यानंतर सौदीच्या क्राऊन प्रिन्सनी अमेरिकेचा दौराच रद्द केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. इराणविरोधात इस्रायल आणि अरब देशांची संयुक्त आघाडी उघडण्याबाबत चर्चा पार पडणार असल्याचे बोलले जात होते. दोन दिवसांपूर्वी निऑम शहरात पार पडलेल्या भेटीत इराणविरोधातील संयुक्त आघाडीबाबत चर्चा झाल्याचा दावा सौदीच्या अधिकाऱ्यांनी ‘इस्रायल हयोम’ या वर्तमानपत्राशी बोलताना केला.

सौदी अरेबियाने अजूनही इस्रायलला अधिकृत पातळीवर राजनैतिक मान्यता दिलेली नाही. पण इस्रालच्या पंतप्रधानांची ही सौदी भेट व क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी केलेली चर्चा, सौदीच्या बदललेल्या धोरणांचे संकेत देत आहे. इस्रायलला मान्यता देण्यास नकार देणाऱ्या इस्लामधर्मिय देशांमध्ये यामुळे खळबळ माजल्याचे दिसत आहे. विशेषतः पाकिस्तानसारख्या देशातील माध्यमे इस्रायली पंतप्रधानांच्या या सौदी भेटीकडे भयचकीत होऊ पाहत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info