पुढील काही दशके कोरोनाच्या साथीचे परिणाम सहन करावे लागतील – संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांचा इशारा

पुढील काही दशके कोरोनाच्या साथीचे परिणाम सहन करावे लागतील – संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांचा इशारा

न्यूयॉर्क – कोरोनाच्या साथीने आतापर्यंत जे काही नुकसान केले आहे ते पुढील अनेक वर्षांमध्ये किंबहुना दशकांमध्ये भरून निघणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनिओ गुतेरस यांनी दिला. दुष्काळ, दारिद्य्र व मंदी यासारख्या संकटांची तीव्रता कोरोनामुळे अधिकच वाढली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. साथीच्या काळात काही देशांनी जागतिक यंत्रणांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे व त्याचे विपरित परिणाम पुढे दिसून आल्याची जाणीवही गुटेरस यांनी यावेळी करून दिली. जगभरातील कोरोनाच्या साथीची लागण झालेल्यांची संख्या साडेसहा कोटींवर गेली असून बळींची संख्या 15 लाखांवर गेली आहे.

परिणाम, सहन, अँटोनिओ गुतेरस, कोरोना, आर्थिक संकट, अर्थसहाय्य, न्यूयॉर्क, लॉकडाऊन, TWW, Third World War

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना साथीची दुसरी लाट आल्याचे उघड झाले आहे. अमेरिका, युरोप, आशिया व आफ्रिका खंडातील बहुतांश देशांमध्ये साथीची दुसरी लाट सुरू झाली असून रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहे. गेल्याच आठवड्यात एकूण रुग्णांची संख्या सहा कोटींवर जाऊन पोहोचल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या सात दिवसात रुग्णांमध्ये तब्बल 50 लाखांहून अधिक रुग्णांची भर पडल्याचे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

‘आपण स्वतःलाच मूर्ख बनवून राहू शकत नाही. कोरोनाच्या साथीवर लस आली असली तरी त्याने आतापर्यंत झालेले नुकसान भरून निघू शकणार नाही. या काळात झालेली हानी जगाला पुढे अनेक वर्षे किंबहुना अनेक दशकांपर्यंत सहन करावी लागणार आहे. दारिद्य्राची व्याप्ती वाढते आहे आणि अनेक देशांमध्ये दुष्काळ गंभीर रुप धारण करण्याचे संकेत आहे. जग गेल्या आठ दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक मंदीला तोंड देत आहे. असमानता व हवामानबदलासारख्या आव्हानांची तीव्रता तसेच व्याप्तीही वाढताना दिसत आहे’, अशा शब्दात राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनिओ गुतेरस यांनी कोरोनाच्या परिणामांबाबत बजावले.

परिणाम, सहन, अँटोनिओ गुतेरस, कोरोना, आर्थिक संकट, अर्थसहाय्य, न्यूयॉर्क, लॉकडाऊन, TWW, Third World War

कमी व मध्यम उत्पन्न असणाऱ्या अनेक देशांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिल्याचे सांगून कर्जाची परतफेड की मूलभूत सुविधा या दुविधेत हे देश सापडल्याची जाणीव संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांनी करून दिली. या देशांना तातडीने अर्थसहाय्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्याचवेळी जगभरात सर्वांना लस उपलब्ध व्हावी यासाठी सुरू केलेल्या उपक्रमात 180हून अधिक देशांनी सहभाग घेतल्याबाबत गुतेरस यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या सहा कोटी 51 लाख, 69 हजार 104वर गेल्याची माहिती जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनने दिली आहे. त्याचवेळी साथीत बळी पडलेल्यांची संख्या 15 लाख, 5 हजार, 527 झाल्याचेही सांगण्यात आले. अमेरिका, युरोप व लॅटिन अमेरिकी देशांमध्ये साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर आले आहे. तर युरोपातील बहुतांश देशांमध्ये पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी सुरू झाली असून अमेरिकेतही मोठ्या प्रांतांनी निर्बंध कठोर करीत असल्याची घोषणा केली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info