Breaking News

चीन, रशियाची हायपरसोनिक क्षेपणास्त्रे युरोपच्या सुरक्षेसाठी दु:स्वप्न ठरतील – जर्मन वर्तमानपत्राचा दावा

बर्लिन – रशिया आणि चीनकडील हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा साठा हा युरोपिय देशांच्या सुरक्षेसाठी दु:स्वप्न ठरते. या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांमुळे युरोपच्या सुरक्षेला असलेल्या धोक्यांचे चक्र सुरू झाल्याची चिंता जर्मन वर्तमानपत्राने व्यक्त केली. रशियाकडे हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना नष्ट करणारी ‘एस-५००’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा देखील आहे. त्यामुळे इतर देश हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज झाले तरी यामुळे रशियाचे काही बिघडू शकत नाही, असा दावा या वर्तमानपत्राने केला.

हायपरसोनिक, चाचणी, एस-५००, क्षेपणास्त्रे, प्रत्युत्तर, रशिया, युरोप, अमेरिका, TWW, Third World War

दहा दिवसांपूर्वी रशियाने आपल्या आण्विक पाणबुडीतून चार आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याचे जाहीर केले होते. पॅसिफिक महासागरातून प्रक्षेपित केलेल्या या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या वायव्येकडील लक्ष्य अचूकतेने भेदले होते. या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचणीमुळे जर्मनीतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर अलर्ट जारी करण्यात आला होता. जर्मनीच्या ‘डाई वेल्ट’ या वर्तमानपत्राने या घटनेची दखल घेतली. तसेच या घटनेमुळे भविष्यातील धोक्यांबाबत युरोपिय देशांना सावध केले आहे.

हायपरसोनिक, चाचणी, एस-५००, क्षेपणास्त्रे, प्रत्युत्तर, रशिया, युरोप, अमेरिका, TWW, Third World War

आंतरखंडीय क्षेपणास्त्र असल्यामुळे अमेरिकेच्या रडार यंत्रणेने ते सहज पकडले आणि युरोपमधील आपल्या लष्करी तळांना अलर्ट केले. पण ही जर रशियाची हायपरसोनिक क्षेपणास्त्रे असती तर ती रडारमध्ये पकडणे तसेच त्यांना प्रत्युत्तर देणे देखील अवघड होऊन बसले असते, याची जाणीव जर्मन वर्तमानपत्राने करुन दिली. त्याचबरोबर रशिया आणि चीन अशा हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्याचा इशारा जर्मन वर्तमानपत्राने दिला.

या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांमुळे हवाई सुरक्षा यंत्रणा तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा परिणामशून्य ठरत आहेत. अशा क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांवर प्रतिसाद देणे अवघड होऊन बसले आहे, असे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. अशी ही हायपरसोनिक क्षेपणास्त्रे येत्या काळात इतर देशांच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरतात. अमेरिका या आघाडीवर रशिया व चीनच्या मागे असल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला. या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांमुळे क्षेपणास्त्रबंदी संबंधी करारांना देखील अर्थ उतर नसल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info