डेन्मार्क व जर्मनीच्या सुरक्षायंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला – ‘आयएस’शी संबंधित १४ संशयितांना अटक

डेन्मार्क व जर्मनीच्या सुरक्षायंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला – ‘आयएस’शी संबंधित १४ संशयितांना अटक

कोपनहेगन/बर्लिन – डेन्मार्क व जर्मनीच्या सुरक्षायंत्रणांनी टाकलेल्या धाडीत ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित १४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. डेन्मार्कमध्ये १३ जणांना तर जर्मनीतून एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सुरक्षायंत्रणांनी सांगितले. संयुक्त कारवाईत शॉटगन्स, रायफल, बॉम्ब बनविण्याची साधने, केमिकल्स तसेच ‘आयएस’चा झेंडा जप्त करण्यात आला. डेन्मार्क व जर्मनीसह युरोपिय देशांमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्याचा मोठा कट उधळल्याचा दावा डेन्मार्कच्या यंत्रणांनी केला.

सुरक्षायंत्रणांनी, हल्ल्याचा कट उधळला, आयएस, दहशतवादी संघटना, दहशतवादविरोधी मोहीम, डेन्मार्क, जर्मनी, कोरोनाव्हायरस, TWW, Third World War

गुरुवार व शुक्रवार असे सलग दोन दिवस डेन्मार्क व जर्मनीच्या सुरक्षायंत्रणांनी व्यापक दहशतवादविरोधी मोहीम राबविली. डेन्मार्कमधील अनेक शहरांमध्ये धाडी टाकण्यात आल्या असून जागांची माहिती उघड करण्यात आलेली नाही. डेन्मार्कमधील कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोन संशयित सिरियन नागरिक आहेत. जर्मनीतही फ्रँकफर्ट शहराजवळ एका सिरियन नागरिकाला अटक करण्यात आली. हे तिघही संशयित एकाच कुटुंबातील असून हल्ल्याचा कट आखणार्‍या दहशतवादी गटाचे नेतृत्त्व करीत होते, असा दावा करण्यात आला आहे.

सुरक्षायंत्रणांनी, हल्ल्याचा कट उधळला, आयएस, दहशतवादी संघटना, दहशतवादविरोधी मोहीम, डेन्मार्क, जर्मनी, कोरोनाव्हायरस, TWW, Third World War

डेन्मार्कमध्ये टाकण्यात आलेल्या धाडीत शॉटगन्स, रायफल, बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे, केमिकल्स जप्त करण्यात आले. जर्मनीतूनही बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी रसायने व पावडर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुरक्षायंत्रणांनी दिली. दहशतवादी एक किंवा त्याहून अधिक हल्ल्यांची तयारी करीत असावेत, असा संशय अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. नव्या कारवाईने डेन्मार्कला असलेला दहशतवादाचा धोका अजूनही गंभीर असल्याचे स्पष्ट होते, असा इशारा डेन्मार्कचे न्यायमंत्री निक हॅकरप यांनी दिला.

सुरक्षायंत्रणांनी, हल्ल्याचा कट उधळला, आयएस, दहशतवादी संघटना, दहशतवादविरोधी मोहीम, डेन्मार्क, जर्मनी, कोरोनाव्हायरस, TWW, Third World War

काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणांनी आफ्रिकेतील दहशतवादी गट युरोपिय देशांवर हल्ले चढविण्याचा कट आखत असल्याचा इशारा दिला होता. आफ्रिका खंडात ‘आयएस’ व ‘अल कायदा’शी संबंधित असणार्‍या गटांकडून हल्ल्याच्या योजना आखण्यात आल्याची माहिती फ्रेंच यंत्रणेला मिळाल्याचे इशार्‍यात सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी आफ्रिकेतील दहशतवादी गटांच्या नेत्यांची बैठक झाल्याचा दावाही फ्रान्सने दिलेल्या इशार्‍यात करण्यात आला होता.

गेल्या वर्षी युरोपात कोरोनाव्हायरसने हाहाकार उडविला असतानाच, फ्रान्स व ऑस्ट्रियात दहशतवादी हल्ले झाले होते. त्यामुळे युरोपिय देशांना असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका पुन्हा एकदा उघड झाला होता. डेन्मार्क व जर्मनीत टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये मिळालेली माहिती या धोक्याला दुजोरा देणारी ठरते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info