इराणच्या धमक्यांची पर्वा न करता इस्रायलचे सिरियात हवाई हल्ले सुरूच

इराणच्या धमक्यांची पर्वा न करता इस्रायलचे सिरियात हवाई हल्ले सुरूच

दमास्कस – इस्रायलने सिरियातील ‘रेड लाईन्स’ अर्थात मर्यादारेषा ओलांडू नये, अशी धमकी इराणने काही तासांपूर्वीच दिली होती. पण इराणच्या या धमकीला किंमत न देता इस्रायलने सिरियातील आणखी एका लष्करी तळावर हल्ला चढविला. या हल्ल्यात नऊ इराणसंलग्न दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो. याबरोबरच इस्रायलने सिरिया व लेबेनॉनच्या सीमेजवळ हवाईसराव सुरू केला आहे.

हवाई हल्ले, हवाईसराव, रेड लाईन्स, दहशतवादी, प्रत्युत्तर, इस्रायल, इराण, गॅलिली रोझ, TWW, Third World War

इस्रायलने सिरियामध्ये मर्यादा ओलांडली तर इराण त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल. या हल्ल्यांसाठी इस्रायलला पश्‍चाताप करावा लागेल, अशी धमकी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने काही तासांपूर्वीच दिली होती. सिरियातील इराणचे तळ व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवर इस्रायल सातत्याने हवाई हल्ले चढवित आहे. गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलच्या सिरियातील या हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, इराणच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍यांनी इस्रायलला धमकावले होते.

हवाई हल्ले, हवाईसराव, रेड लाईन्स, दहशतवादी, प्रत्युत्तर, इस्रायल, इराण, गॅलिली रोझ, TWW, Third World War

इराणच्या या धमकीला काही तास उलटत नाही तोच इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियन राजधानी दमास्कसवर हल्ले चढविले. सिरियन लष्कराने ही माहिती प्रसिद्ध केली. इस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्यांच्या हद्दीतून हे हल्ले चढविले गेले. सिरियन लष्कराच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलचे हल्ले यशस्वरित्या भेदल्याचा दावा सिरियन लष्कराने केला. तसेच इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात किती नुकसान झाले किंवा कोणत्या भागावर हल्ले चढविण्यात आले, याचे तपशील सिरियन लष्कराने प्रसिद्ध केले नाही.

हवाई हल्ले, हवाईसराव, रेड लाईन्स, दहशतवादी, प्रत्युत्तर, इस्रायल, इराण, गॅलिली रोझ, TWW, Third World War

पण ब्रिटनस्थित सिरियातील मानवाधिकार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, राजधानी दमास्कस जवळच्या इराणच्या लष्करी तळावर इस्रायलने हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये इराणसंलग्न संघटनेचे नऊ दहशतवादी ठार झाले. यामध्ये इराणी तसेच पाकिस्तान आणि अफगाणी दहशतवाद्यांचा समावेश आहे. किमान अर्धा तास इस्रायलचे हे हल्ले सुरू होते, असे सिरियन मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. सिरियन हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलचे काही हल्ले भेदले. पण यानंतरही सदर हल्ल्यांमध्ये इराणचे शस्त्रास्त्रांचे गोदाम, क्षेपणास्त्रांचा साठा नष्ट झाल्याची माहिती मानवाधिकार संघटनेने दिली.

रविवारी मध्यरात्रीनंतर इस्रायलने सिरियात हे हल्ले चढविले. त्याच्या काही तास आधी रविवार संध्याकाळपासूनच इस्रायलच्या हवाईदलाने उत्तरेकडील भागात चार दिवसांचा ‘गॅलिली रोझ’ युद्धसराव सुरू केला. आपल्या हवाईदलाच्या युद्धसज्जतेची तयारी पाहण्यासाठी सदर सराव सुरू केल्याचे इस्रायलच्या लष्कराने सोमवारी जाहीर केले. इस्रायलच्या हवाईहद्दीची सुरक्षा, आक्रमक हवाई कारवाई, गोपनीय माहितीचे संकलन यांचा अभ्यास या सरावात केला जाईल. सदर युद्धसराव सिरियासह इराणसाठी इशारा असल्याचे बोलले जाते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info