नातांझ अणुप्रकल्पातील स्फोटात इराणचे प्रवक्ते कमालवंदी जखमी – अमेरिकी वर्तमानपत्राचा दावा

नातांझ अणुप्रकल्पातील स्फोटात इराणचे प्रवक्ते कमालवंदी जखमी – अमेरिकी वर्तमानपत्राचा दावा

कमालवंदी जखमी, स्फोट, बेहरोझ कमालवंदी, प्रवक्ते, नातांझ, ब्लॅकआऊट, इराण, TWW, Third World War

न्यूयॉर्क/तेहरान – इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात रिमोट कंट्रोलद्वारे स्फोट घडविण्यात आला. या स्फोटामध्ये इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते बेहरोझ कमालवंदी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, अशी खळबळ उडविणारी बातमी अमेरिकेचे आघाडीचे वर्तमानपत्र ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने दिली आहे. या वृत्ताला दुजोरा दिलेला नसला तरी जखमी झालेल्या कमालवंदी यांचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहेत. आत्तापर्यंत इराणच्या नातांझ अणुप्रकल्पाच्या सुरक्षेला पडलेले हे सर्वात मोठे खिंडार असल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. इस्रायली माध्यमांनी अमेरिकी वर्तमानपत्राची ही बातमी उचलून धरली आहे.

रविवारी सकाळी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात ब्लॅकआऊट झाला होता. सुरुवातीला हा एक अपघात असल्याचा दावा करणार्‍या इराणने सोमवारी यामागे इस्रायल असल्याचा ठपका ठेवला. अणुप्रकल्पावरील हल्ला म्हणजे आण्विक दहशतवाद असल्याचे सांगून इस्रायलचा सूड घेण्याची धमकी इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी दिली होती. या हल्ल्यामुळे इराणचा अणुकार्यक्रम नऊ महिने मागे पडल्याचे दावा अमेरिकी वर्तमानपत्राने केला. इराणने हा दावा फेटाळला असला तरी प्रकल्पातील हल्ल्याबाबत अधिक माहिती प्रसिद्ध केलेली नाही.

कमालवंदी जखमी, स्फोट, बेहरोझ कमालवंदी, प्रवक्ते, नातांझ, ब्लॅकआऊट, इराण, TWW, Third World War

मात्र अमेरिकी वर्तमानपत्राने नातांझ अणुप्रकल्पात रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने स्फोट घडविल्याची बातमी मंगळवारी प्रसिद्ध केली. गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍याचा हवाला देऊन अमेरिकी वर्तमानपत्राने हा दावा केला. या स्फोटात प्रकल्पातील प्राथमिक तसेच बॅकअपसाठी असलेली इलेक्ट्रिकल यंत्रणा निकामी झाली. या स्फोटात इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते कमालवंदी देखील जखमी झाले. त्यांच्या डोके, पाठ, हात आणि पायाला दुखापत झाली असून स्थानिक पत्रकाराने जखमी कमालवंदी यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

या व्हिडिओमध्ये कमालवंदी यांनी स्फोटाच्या तीव्रतेची माहिती दिली. या स्फोटामुळे प्रकल्पात सात मीटर खोल खड्डा तयार झाला, त्यात आपण कोसळलो, मात्र हेल्मेट असल्यामुळे आपण बचावलो, असे कमालवंदी यांनी म्हटले आहे. या स्फोटामुळे इराणच्या सुरक्षा यंत्रणेच्या क्षमतेवर प्रश्‍न उपस्थित झाल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने म्हटले आहे.

कमालवंदी जखमी, स्फोट, बेहरोझ कमालवंदी, प्रवक्ते, नातांझ, ब्लॅकआऊट, इराण, TWW, Third World War

मंगळवारी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर इराणचे परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी नातांझमध्ये घातपात घडवून इस्रायलने जुगारातला भयंकर डाव खेळल्याचा आरोप केला आहे. याआधीच इराणने इस्रायलचा सूड घेण्याची धमकी दिली होती.

इस्रायलने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांनी मंगळवारी स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना मोठा दावा केला. ‘एका रात्रीत कुणीतरी घुसून ही मोहीम फत्ते केलेली नाही. कदाचित १० ते १५ वर्षांपूर्वीच सदर ठिकाणी स्फोटके पेरलेली असावी’, असे चक्रावून टाकणारे उद्गार ओल्मर्ट यांनी काढले आहेत. याआधी इस्रायलने नातांझ अणुप्रकल्पावर सायबर हल्ले चढविले होते. तर इस्रायलचे गुप्तचर प्रमुख योसी कोहेन यांनी तर स्वतःच इराणच्या अणुप्रकल्पात घुसून संवेदनशील कागदपत्रे मिळविल्याची माहिती उघड झाली होती. तसेच इराणचे अणुशास्त्रज्ञ फखरिझादेह यांना इस्रायलने संपविले होते. तर आता नातांझच्या अणुप्रकल्पात झालेल्या स्फोटाची तयारी १० ते १५ वर्षे आधीच झालेली असू शकते, हे सांगून इस्रायलच्या माजी पंतप्रधानांनी याबाबतचे गूढ अधिकच वाढविले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info