अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यांमध्ये 25 जणांचा बळी

अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यांमध्ये 25 जणांचा बळी
  • चोवीस तासातील कारवाईत 167 तालिबानी ठार
  • तालिबानकडून 37 अफगाणी जवानांचे अपहरण

काबुल – अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतात तालिबानने घडविलेल्या स्फोटांमध्ये 25 जणांचा बळी गेला. यामध्ये अफगाणी सुरक्षादलाच्या 14 जवानांचा समावेश आहे. शनिवारी रात्री तालिबानने फरयाब प्रांतात चढविलेल्या हल्ल्यात 37 अफगाणी जवानांचे अपहरण केले. तर गेल्या चोवीस तासात तालिबानच्या 167 दहशतवाद्यांना ठार केल्याची घोषणा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केली.

अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यांमध्ये 25 जणांचा बळी – चोवीस तासातील कारवाईत 167 तालिबानी ठार / तालिबानकडून 37 अफगाणी जवानांचे अपहरण16 प्रांतातील तालिबानच्या ठिकाणांवर कारवाई केल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. नांगरहार, लघमान, मैदान वरदाक, लोगार, पाकतिका, दायकूंडी, झाबूल, बदघीस, हेरात, घोर, बल्ख, जोवझान, समान्गन, बघलान, बदाखशान आणि हेल्मंडमधील कारवाईत 167 दहशतवाद्यांना ठार केले तर 59 जण जखमी झाले.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/taliban-attacks-in-afghanistan-killed-at-least-25/