वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या दक्षिण भागातील ग्वांगडाँग प्रांतातील अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पात भागीदारी असणार्या फ्रेंच कंपनीने यासंदर्भातील माहिती अमेरिकेला दिल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चिनी यंत्रणांनी सर्व आलबेल असल्याचे निवेदन दिले असून, फ्रेंच कंपनीने तीन ओळींच्या निवेदनात ‘परफॉर्मन्स इश्यू’चा उल्लेख करून घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अमेरिकी माध्यमांनी सदर घटनाक्रम 1986 साली चेर्नोबिलमध्ये झालेल्या दुर्घटनेप्रमाणे असल्याचा दावा केला आहे.
चीनच्या दक्षिण भागातील ग्वांगडाँग प्रांतात ‘ताईशान’ अणुप्रकल्प असून त्यात दोन अणुभट्टया कार्यरत आहेत. हा प्रकल्प चीन व फ्रान्सने संयुक्तरित्या उभारला आहे. फ्रान्सच्या ‘फ्रॅमअॅटम’ या कंपनीने प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून देखभालीचीही जबाबदारी या कंपनीकडेच आहे. या कंपनीने गेल्या महिन्यात ‘ताईशान’ अणुप्रकल्पासंदर्भात अचानक अमेरिकेशी संपर्क साधल्याचे ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात सांगण्यात आले. त्यानंतर 3 जूनला सदर कंपनीकडून अमेरिकी यंत्रणांना पाठविण्यात आलेल्या पत्रात अणुप्रकल्पातून ‘फ्युजन गॅस’ची गळती होत असून सुरक्षेचा मुद्दा निर्माण होऊ शकतो, असे सांगण्यात आले.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/fear-of-radiation-due-to-china-taishan-nuclear-plant-leak/