बैरूत – इस्रायलने पॅलेस्टिनींच्या भावना दुखावल्या तर इस्रायलच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करणार्या रॉकेट्सचा पुन्हा वर्षाव करू, अशी धमकी हमासने दिली आहे. लेबेनॉनमधील हिजबुल्लाहशी संलग्न असलेल्या वर्तमानपत्राने हमासची ही धमकी प्रसिद्ध केली. 11 दिवसाच्या घनघोर संघर्षानंतर इस्रायल आणि हमासमध्ये संघर्षबंदी झालेली आहे खरी. पण ही संघर्षबंदी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. कुठल्याही क्षणी इथे संघर्ष पेट घेऊ शकतो, असे इशारे हमास तसेच इस्रायलकडून सातत्याने दिले जात आहेत.
1967 साली इस्रायल आणि शेजारच्या देशांबरोबर सहा दिवसांचे युद्ध पेटले होते. या युद्धात विजयी झालेल्या इस्रायलने जेरूसलेमला आपल्या देशात जोडून टाकले होते. याची आठवण म्हणून दरवर्षी 10 मे रोजी इस्रायलमध्ये विजयी मिरवणूक काढून हा विजयदिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे गेल्या महिन्यात यानिमित्ताने मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. पण हमासने गाझापट्टीतून रॉकेट्सचा वर्षाव केल्यानंतर इस्रायल सरकारला सदर मिरवणूक पुढे ढकलावी लागली होती.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/hamas-will-once-again-rain-rockets-on-israeli-cities/