अमेरिकेने चिनी कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधाना प्रत्युत्तर देऊ – चीनचा इशारा

निर्बंधाना प्रत्युत्तर

बीजिंग – उघुरांच्या मुद्यावर अमेरिकेने चिनी कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांना कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा चीनने दिला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने उघुरवंशियांवरील अत्याचारातील सहभागावरून 14 चिनी कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ केले होते. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने झिंजिआंगमधील उघुरवंशियांच्या मुद्यावरून चिनी कंपन्यांना लक्ष्य करण्याची ही दुसरी वेळ आहे.

‘झिंजिआगंमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात सहाय्य करणार्‍या व चीनच्या लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी अमेरिकी तंत्रज्ञान वापरणार्‍या कंपन्यांविरोधात कठोर व निर्णायक कारवाई करण्यास अमेरिकेचा वाणिज्य विभाग वचनबद्ध आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरणार्‍या व अमेरिकी मूल्यांशी विसंगत असणार्‍या कारवाया करणार्‍या व्यक्ती, कंपन्या व देशांविरोधात आक्रमक धोरण राबविले जाईल’, अशा शब्दात अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जिना रायमोंडो यांनी चीनविरोधातील कारवाईचे समर्थन केले.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/china-warns-of-responding-to-us-sanctions-on-chinese-companies/