- 24 तासात 13 जिल्ह्यांवर तालिबानचा ताबा
- कंदहारमध्ये सुरक्षेसाठी शेकडो जणांचे स्थलांतर
- अफगाणी जवानांनी ताजिकिस्तानात आश्रय घेतला
काबुल – गेल्या चोवीस तासात तालिबानच्या 143 दहशतवाद्यांना ठार केल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. मात्र अफगाणी जनता आणि लष्करात तालिबानची दहशत वाढल्याचे समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात तालिबानने अफगाणिस्तानमधील 13 जिल्ह्यांचा ताबा घेतला. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नसली तरी तालिबानच्या दहशतीमुळे कंदहार, कुंदूझ, जोवझान प्रांतात शेकडो नागरीकांनी स्थलांतर केल्याच्या बातम्या येत आहेत. तर तालिबानच्या हल्ल्यांमुळे घाबरलेल्या 300 हून अधिक अफगाणी जवानांनी ताजिकिस्तानमध्ये पलायन केले.