युक्रेनपेक्षा अमेरिकेच्या सीमेवर सैन्यतैनातीची सर्वाधिक आवश्यकता – माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

टेक्सास – ‘बायडेन प्रशासनातील प्रत्येकाला युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात करण्याचे वेड लागले आहे. पण या सैन्यतैनातीची खरी गरज युक्रेनच्या सीमेवर नाही, तर अमेरिकेच्याच सीमेवर आहे. बायडेन यांनी टेक्सास सीमेच्या सुरक्षेसाठी सैन्य रवाना करण्याची आवश्यकता आहे’, अशा शब्दात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर ताशेरे ओढले.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

गेल्या वर्षभरात अमेरिका-मेक्सिको सीमेवर बेकायदेशीर निर्वासितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या निर्वासितांच्या या घुसखोरीकडे बायडेन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची टीका मेक्सिकोच्या सीमेवरील प्रांताचे नेते व स्थानिक करीत आहेत. हजारो निर्वासित बेपत्ता झाले असून यामुळे अमेरिकन सुरक्षा यंत्रणेवरील ताण वाढत असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर ताशेरे ओढले.

निर्वासितांची ही घुसखोरी अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोक्याची सूचना असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला. ‘बायडेन यांनी याआधीच अमेरिकेची सीमा हल्लेखोरांच्या स्वाधीन केली आहे. आता सारे जग या मोकळ्या सीमेतून अमेरिकेत घुसखोरी करीत आहेत. अमेरिकेच्या नेत्यांनी दुसर्‍याच्या देशात सैन्य घुसविण्यापेक्षा आपल्या देशातील बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याकडे लक्ष पुरवावे’, असे ट्रम्प यांनी फटकारले.

दरम्यान, काही तासांपूर्वीच युक्रेनमध्ये निर्माण झालेला तणाव ही युरोपची समस्या आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी यामध्ये अमेरिकेला अडकवू नये, असा टोला अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल किथ केलॉग यांनी लगावला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info