युक्रेनवरील आक्रमणासाठी रशिया रासायनिक हल्ल्याचा वापर करु शकतो

- अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

वॉशिंग्टन – युक्रेनवर आक्रमणासाठी पार्श्‍वभूमी म्हणून रशिया खर्‍या रासायनिक हल्ल्याचा वापर करु शकतो, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेत हा दावा करताना रशिया ‘फॉल्स फ्लॅग अटॅक’चाही पर्याय वापरु शकतो, असे ब्लिंकन यांनी बजावले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही रशिया येत्या काही दिवसात युक्रेनवर आक्रमण करु शकतो, असा इशारा दिला आहे.

रासायनिक हल्ल्याचा वापर

अमेरिका व युरोपिय देश सातत्याने रशिया युक्रेनवर आक्रमण करणार असल्याचे दावे करीत आहेत. यापूर्वी पाश्‍चात्य गुप्तचर यंत्रणा व माध्यमांनी १६ फेब्रुवारीला रशिया आक्रमण करेल, असे बजावले होते. मात्र त्यादिवशी रशियाने आक्रमण न करता उलट काही सैन्य माघारी घेतल्याचे वृत प्रसिद्ध झाले. त्यामुळे पाश्‍चात्यांचे दावे फोल ठरले आहेत. मात्र त्यानंतरही अमेरिकेसह इतर देशांनी रशियाविरोधात इशारे देणे चालू ठेवल्याचे ब्लिंकन व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

रासायनिक हल्ल्याचा वापर

परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेतच रशियाला लक्ष्य केले. ‘रशियाचे दीड लाखांहून अधिक सैन्य युक्रेनच्या सीमेवर तैनात आहे. या सैन्याने माघार घेतल्याचे दिसलेले नाही. उलट येत्या काही दिवसात युक्रेनवर आक्रमण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रशियात घडविण्यात आलेला दहशतवादी हल्ला, सामूहिक थडगे मिळणे, ड्रोनचा हल्ला किंवा रासायनिक शस्त्रांचा वापर करून केलेला खरा हल्ला यातील कोणताही पर्याय रशिया वापरु शकते’, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले.

परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही, रशियन हल्ल्याची शक्यता वाढल्याचे म्हटले आहे. युरोपमध्ये नव्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वाढली असून रशिया येत्या काही दिवसांमध्ये हल्ला चढवू शकते, असा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केला. हे दावे समोर येत असतानाच पूर्व युक्रेनमधील एका शाळेवर रॉकेटहल्ला झाल्याचे वृत्त देण्यात आले आहे. या हल्ल्यात शाळेचे नुकसान झाल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. हल्ला नक्की कोणी केला याबाबत ठोस माहिती देण्यात आलेली नाही.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info