अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या चुकीच्या हाताळणीमुळे युक्रेनच्या युद्धाचे रुपांतर तिसऱ्या महायुद्धात होईल

- माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घणाघाती टीका

नॅशव्हेल – ‘युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि त्याचे तिसऱ्या महायुद्धात रुपांतर होण्याची शक्यता आहे. याचे कारण अमेरिकेने ही परिस्थिती अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळलेली आहे’, असा घणाघात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ज्यो बायडेन यांच्याऐवजी मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर असतो, तर ही परिस्थितीच उद्भवली नसती, रशियन राष्ट्राध्यक्ष युक्रेनवर हल्ला चढविण्यास धजावलेच नसते, असे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढे म्हणाले.

तिसऱ्या महायुद्धात

अमेरिकेच्या टिनेसी राज्यातील आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाच्या धोरणावर जोरदार हल्ला चढविला. बायडेन प्रशासनाने आत्तापर्यंत युक्रेनला तब्बल 56 अब्ज डॉलर्सच्या अर्थसहाय्याची घोषणा केली. पण ज्या जर्मनी आणि फ्रान्सला या युद्धाचे अमेरिकेपेक्षाही कितीतरी अधिक परिणाम सहन करावे लागती, त्या देशांनी युक्रेनला अमेरिकेच्या तुलनेत केलेले अर्थसहाय्य नगण्य ठरते, याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले.

अमेरिकेच्या निवडणुकीत घोटाळे व गोंधळ घालून आपल्या जागी ज्यो बायडेन यांना राष्ट्राध्यक्षपदावर आणले नसते, तर ही वेळच आली नसती. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपण चांगलेच ओळखून आहोत. त्यांच्याशी आपली चर्चाही झालेली आहे. त्यामुळे आपण युक्रेनवर हल्ला चढविला, तर त्याची काय प्रतिक्रिया उमटेल, याची पुतिन यांना नक्कीच जाणीव होती, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पण बायडेन यांच्यासारखे दुबळे नेते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आहेत आणि त्यामुळेच रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनवर हल्ला चढविला, अशी घणाघाती टीका माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली.

युक्रेनमधील युद्धाचा अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणावर परिणाम होऊ लागला असून रशियाला रोखण्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना अपयश आल्याची टीका अधिकच तीव्र झाली आहे. त्यातच इंधन दरवाढ, महागाई याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन जबाबदार असल्याचे आरोप करून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्यावरील जबाबदारी झटकल्याचे आरोप होत आहेत. बायडेन यांची लोकप्रियता दिवसागणिक अधिकाधिक घसरत चालली आहे. अशा परिस्थितीत 2024 सालासाठी डेमोक्रॅट पक्षाने राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करू नये, अशी मागणी या पक्षातून होत आहे.

याचा दाखला देऊन टेनेसी येथील आपल्या भाषणात माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण 2024 साली पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा करून टाकली. याला टेनेसी राज्याच्या नॅशव्हेल येथे पार पडलेल्या या सभेत उपस्थितांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info