युक्रेनमधील युद्ध हे जागतिक महायुद्धच आहे – सर्बियाच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

जागतिक महायुद्धच

बेलग्रेड/मॉस्को/किव्ह – रशिया व युक्रेनमधील युद्ध हे जागतिक महायुद्धच आहे, असा दावा सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांनी केला. ‘संपूर्ण पाश्चिमात्य जग युक्रेनच्या माध्यमातून रशियाच्या विरोधात लढत आहे. त्यामुळे हे महायुद्ध सुरू असताना यापुढे युक्रेनमधील संघर्ष हा क्षेत्रिय किंवा स्थानिक संघर्ष आहे, असे बोलणे टाळायला हवे’, असेही सर्बियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे बजावले. सर्बिया हा रशियाचा समर्थक देश म्हणून ओळखण्यात येतो.

जागतिक महायुद्धच

सर्बियातील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष वुकिक यांनी तीनदा रशिया-युक्रेन युद्ध हे जागतिक महायुद्धच असल्याचा उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनाच याची जाणीव असायला हवी, असेही सर्बियन राष्ट्राध्यक्षांनी मुलाखतीत स्पष्ट केले. या युद्धाचे परिणाम बाल्कन क्षेत्रावरही होत असले तरी सर्बिया या क्षेत्रात शांतता कायम रहावी म्हणून प्रयत्न करील, असा दावाही त्यांनी केला.

जागतिक महायुद्धच

‘पुढे काय घडणार आहे, याची मला कल्पना आहे. सेव्हेर्स्क, बाखमत व सोलेदारमधील कारवाई संपली आणि स्लोव्हियान्स्क-क्रॅमाटोर्स्क-ॲव्हडिव्का आघाडीपर्यंतचा भाग ताब्यात आला की व्लादिमिर पुतिन एक प्रस्ताव पुढे करतील. पाश्चिमात्य देशांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही किंबहुना ते तो स्वीकारणारच नाहीत. असे झाले तर युद्ध अधिकच तीव्र व भयावह होईल’, असा इशारा सर्बियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला. सर्बियाचे नेते जागतिक महायुद्धाचा उल्लेख करीत असतानाच रशियाने युक्रेनमधील आपल्या मोहिमेची व्याप्ती अधिक तीव्र केली. दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह शहरावर शुक्रवारी मोठे क्षेपणास्त्र हल्ले चढविण्यात आले. या हल्ल्यांसाठी ‘एस-300′ क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. शहराच्या मध्यभागातील अनेक इमारती या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्याची माहिती युक्रेनच्या यंत्रणांनी दिली. मायकोलेव्हबरोबरच डोन्बास क्षेत्रातील सिव्हेर्स्क, बाखमत व स्लोव्हियान्स्क या शहरांवरही आक्रमक मारा सुरू आहे.

दरम्यान, रशियाविरोधातील हल्ल्यांसाठी युक्रेनला देण्यात येणाऱ्या शस्त्रसाठ्याच्या वापराबाबत पाश्चिमात्य देशांमध्ये प्रश्नचिन्हे उभी करण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील काही माध्यमे तसेच विश्लेषकांनी याबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले असून शस्त्रसाठ्यावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. अमेरिकेसह युरोपिय देशांनी युक्रेनला अब्जावधी डॉलर्सचा शस्त्रपुरवठा केला आहे. या पुरवठ्यावरून रशियाने सातत्याने इशारेही दिले आहेत. पाश्चिमात्य देश जितक्या प्रमाणात शस्त्रसाठा वाढवतील त्या प्रमाणात युद्धाची तीव्रता व कालावधी वाढत जाईल, असे रशियाने बजावले आहे.

Englishहिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info