रशिया युक्रेनमधील हिवाळ्याचा युद्धातील शस्त्रासारखा वापर करीत आहे

- नाटोचा आरोप

शस्त्रासारखा वापर

बुखारेस्ट/मॉस्को/किव्ह – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनमधील कडक हिवाळ्याचा युद्धातील शस्त्रासारखा वापर करीत आहे, असा आरोप नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केला. बुखारेस्टमध्ये नाटोची विशेष बैठक सुरू असून या बैठकीत नाटोच्या इतर सदस्य देशांनीही नागरी वस्त्यांवर होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांवरून रशियावर टीका केली. मात्र रशियाने हे आरोप फेटाळले असून युक्रेनच्या लष्करी मोहिमेसाठी उपयुक्त ठरतील, अशा जागांवर हल्ले करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, युक्रेनमधील कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोपिय देशांनी युक्रेनमधील अधिकाधिक निर्वासित स्वीकारण्याची तयारी ठेवावी, असे आवाहनही नाटोकडून करण्यात आले.

शस्त्रासारखा वापर

रशियाने गेल्या दोन महिन्यात राजधानी किव्हसह युक्रेनमधील अनेक शहरांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. यात हल्ल्यांमुळे युक्रेनमधील जवळपास ४० टक्के वीजपुरवठा यंत्रणा तसेच पाणीपुरवठा व्यवस्था आणि ‘हिटिंग सिस्टिम’ उद्ध्वस्त झाली आहे. युक्रेनमधील एक कोटी नागरिकांना याचा फटका बसल्याची माहिती देशाचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नुकतीच दिली होती. युक्रेनच्या राजधानीत सध्या सरासरी तापमान दोन डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरले आहे. पुढील महिन्यात यात शून्य ते उणे पाच अंशांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. या कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज, पाणी व हिटिंग या तिन्ही गोष्टींचा अभाव किंवा कमतरता युक्रेनी नागरिकांसाठी जीवघेणी ठरु शकते. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात इशारा दिला होता.

शस्त्रासारखा वापर

या पार्श्वभूमीवर नाटोने रशियावर ‘विंटर वेपन’चा आरोप करून लक्ष वेधून घेतले आहे. ‘राष्ट्राध्यक्ष पुतिन आता हिवाळ्याचा युक्रेनविरोधातील युद्धातील शस्त्र म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे भयावह असून युक्रेनवर अधिकाधिक हल्ले होतील, हे गृहित धरून आपण तयारी ठेवायला हवी. नाटोला याची जाणीव असून युक्रेनला करण्यात येणारे सहाय्य वाढविण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत’, असे नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी सांगितले. नाटोतील सदस्य देशांच्या मंत्र्यांनीही स्टॉल्टनबर्ग यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.

युक्रेनमधील कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अमेरिकेने ५.३ कोटी डॉलर्सचे स्वतंत्र अर्थसहाय्य घोषित केले आहे. यात वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणांसह इतर सहाय्याचा समावेश असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले.

हिंदी   मराठी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info