Breaking News

रशियाच्या बँकिंग आणि चलनव्यवहारावर निर्बंध लादल्यास ते अमेरिकेने पुकारलेले आर्थिक युद्धच मानले जाईल – रशियाच्या पंतप्रधानांचा इशारा

मॉस्को – अमेरिकेने यापुढे रशियाच्या बँकिंग क्षेत्रावर किंवा चलन व्यवहारांवर निर्बंध लादले तर ती आर्थिक युद्धाची घोषणा ठरेल, असा खरमरीत इशारा रशियाचे पंतप्रधान दिमित्रि मेदेवेदेव्ह यांनी दिला. अमेरिकेने बुधवारी, ब्रिटनमधील माजी हेरावर केलेल्या विषप्रयोग प्रकरणी रशियाच्या इलेक्ट्रॉनिक्स तसेच संवेदनशील तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर निर्बंध जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मेदवेदेव्ह यांनी दिलेली आक्रमक प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणारी ठरते.

चलनव्यवहार, आर्थिक युद्ध, पंतप्रधान मेदवेदेव्ह, बँकिंग, अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था, प्रत्युत्तर, WW3, रशिया, ब्रिटन

‘पण अमेरिकेने रशियाच्या बँकिंग क्षेत्राच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या चलनांच्या व्यवहारांवर बंदी टाकण्याचा प्रयत्न केला, तर ही घटना रशियासाठी आर्थिक युद्धाची घोषणा ठरण्याची शक्यता आहे. या आर्थिक युद्धाला रशिया केवळ आर्थिक पातळीवरच नाही तर राजकीय आणि गरज पडल्यास इतर कोणत्याही स्तरावर प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवेल. आमच्या अमेरिकन मित्रांनी या गोष्टीची नीट जाणीव ठेवावी’, अशा खणखणीत शब्दात रशियन पंतप्रधानांनी अमेरिकेला खडसावले.

यावेळी मेदवेदेव्ह यांनी, रशियावर यापूर्वी अनेकदा आर्थिक निर्बंध लादल्याचा इतिहास असून त्याने रशियाला काहीही फरक पडला नसल्याची आठवणही करून दिली. ‘गेली १०० वर्षे रशिया निर्बंधांच्या दबावाखाली वावरतो आहे. अमेरिका व सहकारी देशांनी जागतिक स्पर्धा संपविण्यासाठी निर्बंधांचा वापर केला आहे. मात्र त्याने काहीही बदल झालेला नाही’, अशा शब्दात रशिया निर्बंधांपुढे झुकणार नसल्याचे पंतप्रधान मेदवेदेव्ह यांनी बजावले. यावेळी त्यांनी रशियाच्या युरोपातील इंधन निर्यातीवर लादलेले निर्बंध तसेच चीनवर लादलेल्या निर्बंधांचा उल्लेख केला.

चलनव्यवहार, आर्थिक युद्ध, पंतप्रधान मेदवेदेव्ह, बँकिंग, अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था, प्रत्युत्तर, WW3, रशिया, ब्रिटन

रशियाच्या पंतप्रधानांनी अमेरिकी निर्बंधांविरोधात दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन तसेच इतर रशियन नेते व अधिकार्‍यांनी अमेरिकेच्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्याचा इशारा देण्याव्यतिरिक्त विशेष आक्रमक वक्तव्ये केली नव्हती. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकी निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर रशियन अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत असल्याचा दावाही नुकताच केला होता. या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान मेदवेदेव्ह यांचा आक्रमक सूर रशियाचे धोरण बदलत असल्याचे संकेत देणारा दिसत आहे.

अमेरिकेने बुधवारी रशियाविरोधात जाहीर केलेल्या निर्बंधांचे तीव्र पडसाद रशियात उमटले होते. रशियन चलन रुबलच्या मूल्यात मोठी घसरण झाली असून त्याचे मूल्य ऑगस्ट २०१६ नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. त्याचवेळी रशियातील शेअरबाजारांमध्येही मोठी घसरण झाल्याचे समोर आले असून गेल्या काही दिवसातील हा सर्वात मोठा फटका असल्याचे सांगण्यात येते. या घटनांनी अमेरिकी निर्बंध रशियाला धक्का देण्यात यशस्वी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

English हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info