रशियाकडून ‘अदृश्य’ उपग्रहाच्या निर्मितीचे दावे

रशियाकडून ‘अदृश्य’ उपग्रहाच्या निर्मितीचे दावे

मॉस्को – पृथ्वीवर प्रगत ‘स्टेल्थ लढाऊ विमानां’च्या निर्मितीचे दावे होत असतानाच रशियाने त्यापुढे एक पाऊल टाकल्याचे संकेत दिले आहेत. रशियन अंतराळसंस्था ‘रॉस्कॉसमॉस’ने आपण अंतराळात इतरांना दिसू शकणार नाही, असा उपग्रह तयार केल्याचे म्हटले आहे. अंतराळात फिरणार्‍या उपग्रहांना ‘एअर बबल रॅप’च्या सहाय्याने अदृश्य करणारे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा ‘रॉस्कॉसमॉस’ने केला.

रशिया, उपग्रहाच्या निर्मितीचे दावे, एअर बबल रॅप, उपग्रह, रशिया

नव्या तंत्रज्ञानामुळे पृथ्वीवरून आपले अंतराळातील उपग्रह दिसणार नसल्याचे ‘रॉस्कॉसमॉस’ने म्हटले आहे. पृथ्वीभोवती १० ते २० हजार किलोमीटर अंतरावर फिरणार्‍या उपग्रहांना अदृश्य करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, असा दावाही रशियन अंतराळसंस्थेने केला. काही दिवसांपूर्वीच रशियाने अंतराळातील कचर्‍याच्या समस्येला उत्तर म्हणून आपोआप नष्ट होणारा उपग्रह विकसित केल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ अदृश्य उपग्रहाचा दावा करून रशियाने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info