उत्तर कोरियाने पाणबुडीतून क्षेपणास्त्र चाचणी केली

उत्तर कोरियाने पाणबुडीतून क्षेपणास्त्र चाचणी केली

सेऊल – पाणबुडीतून क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्याची घोषणा उत्तर कोरियाने केली. आपल्या लष्करी सामर्थ्यात वाढ आणि शत्रूंच्या कारवायांना आवर घालण्यासाठी ही चाचणी महोती, असे उत्तर कोरियाने जाहीर केले. उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीवर जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.

उत्तर कोरियाच्या लष्कराने बुधवारी पूर्वेकडील सागरी क्षेत्रात क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्याची माहिती दक्षिण कोरियन लष्कराने प्रसिद्ध केली होती. पहिल्यांदाच आपल्या शेजारी देशाने पाणबुडीतून मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला होता. गुरुवारी उत्तर कोरियाने या चाचणीची माहिती जाहीर केली. ‘पुकूक्साँग-३’ या नव्या क्षेपणास्त्राची पाणबुडीतून चाचणी घेतली. पुकूक्साँग-३ क्षेपणास्त्र जपानच्या सागरी हद्दीजवळ कोसळल्याचा दावा केला जातो. आतापर्यंत उत्तर कोरियाने मोबाईल लाँचर्सवरुन क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. पण पहिल्यांदाच पाणबुडीतून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन उत्तर कोरियाने मोठा धक्का दिला आहे.

या क्षेपणास्त्र चाचणीच्या काही तास आधी उत्तर कोरियाने अमेरिकेला चर्चेचा प्रस्ताव दिला होता. सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये चर्चा सुरू होणार असल्याचे बोलले जात होते. जपाननेदेखील या चर्चेचे स्वागत केले होते. तसेच आपणही उत्तर कोरियाशी चर्चा करण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया जपानने दिली होती. पण उत्तर कोरियाच्या या चाचणीनंतर पुन्हा एकदा कोरियन क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे.

अमेरिकेने ‘मिनिटमन थ्री’ या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

अमेरिकेच्या वायुसेनेने बुधवारी ‘मिनिटमन थ्री’ या बहुचर्चित आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. कॅलिफोर्नियाच्या ‘वँडनबर्ग एअर फोर्स’ तळावरुन सदर क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले. पॅसिफिक महासागराच्या दिशेने प्रक्षेपित केलेल्या या क्षेपणास्त्राने मार्शल आयलँडच्या हद्दीतील आपले लक्ष्य अचूकरित्या भेदल्याची माहिती अमेरिकेच्या ‘ग्लोबल स्ट्राईक कमांड’ने दिली.

अमेरिकेच्या दिशेने येणार्‍या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर म्हणून ‘मिनिटमन थ्री’ची ही चाचणी केल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या वायुसेनेने गेल्या वर्षभरात दुसर्‍यांदा या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.

English   हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info