इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर अमेरिकन बॉम्बर्सची इस्रायल-पर्शियन आखातात गस्त

इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर अमेरिकन बॉम्बर्सची इस्रायल-पर्शियन आखातात गस्त

बैरूत – अमेरिकेच्या दोन ‘बी-५२’ बॉम्बर विमानांनी इस्रायलच्या हद्दीतून पर्शियन आखात अशी गस्त पूर्ण केली आहे. अमेरिकेच्या बॉम्बर विमानांची ही गस्त इस्रायलसह सौदी अरेबिया, युएई, बाहरिन या आपल्या मित्रदेशांना आश्‍वस्त करण्यासाठी असल्याचा दावा केला जातो. दोन दिवसांपूर्वी इराणने हिंदी महासागर क्षेत्रात लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली होती. या क्षेत्रात तैनात असलेल्या अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेला तसेच आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांना धमकावण्यासाठी इराणने ही कारवाई केल्याचे बोलले जाते. यानंतर अमेरिकेने बॉम्बर विमानांची गस्त पूर्ण करून इराणला उत्तर दिले आहे.

अमेरिकन बॉम्बर्स, गस्त, बी-५२, विमान, युद्धसराव, इराण, अमेरिका, युएसएस निमित्झ, TWW, Third World War

गेल्या दीड महिन्यांमध्ये अमेरिकेने पर्शियन आखातात किमान सहा ‘बी-५२’ बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. यापैकी दोन बॉम्बर विमानांनी रविवारी आपली या क्षेत्रातील ‘प्रेझेन्स पेट्रोल’ पूर्ण केली. संबंधित क्षेत्रातील मित्रदेशांना आश्‍वस्त करण्यासाठी तसेच आपल्या हितसंबंधांसाठी धोकादायक असणार्‍या देशांना इशारा देण्यासाठी ‘प्रेझेन्स पॅट्रोल’ केले जाते. अमेरिकी बॉम्बर विमानांची गस्त या प्रकारात मोडते. इस्रायली दैनिकाने बॉम्बर्सच्या गस्तीची बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर अमेरिकेच्या लष्कराने ‘प्रेझेन्स पॅट्रोल’ची माहिती दिली. ‘अल्पावधीत तैनातीसाठी सज्ज असणार्‍या व सामरिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही बॉम्बर विमाने या क्षेत्रातील अमेरिकेच्या संरक्षण भूमिकेतील महत्त्वाचा भाग ठरतात’, अशी माहिती अमेरिकेच्या ‘सेंटकॉम’ कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी दिली. गेल्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकेच्या बॉम्बर्स विमानांनी या क्षेत्रातून पूर्ण केलेली ही पाचवी गस्त असल्याचा दावा आखाती माध्यमे करीत आहेत. तर ‘बी-५२’ विमानांची या क्षेत्रातील ही दुसरीच गस्त असल्याचे अमेरिकेच्या लष्कराने म्हटले आहे.

अमेरिकन बॉम्बर्स, गस्त, बी-५२, विमान, युद्धसराव, इराण, अमेरिका, युएसएस निमित्झ, TWW, Third World War

गेल्या आठवड्यात इराणने आपल्या युद्धसरावादरम्यान, लांब पल्ल्याची दोन क्षेपणास्त्रे हिंदी महासागर क्षेत्रात डागली होती. यातील एक क्षेपणास्त्रे व्यापारी जहाजापासून अवघ्या २० मैल अंतरावर कोसळले. तर दुसरे क्षेपणास्त्र ‘युएसएस निमित्झ’ या अण्वस्त्रवाहू युद्धनौकेपासून १०० मैल अंतरावर आदळले. अमेरिकी युद्धनौका आणि या क्षेपणास्त्रातील अंतर मोठे असले तरी या कारवाईद्वारे इराणने अमेरिकेच्या युद्धनौकांना तसेच अमेरिकेच्या आखाती मित्रदेशांनी इशारा दिल्याचा दावा इराणी वृत्तसंस्थेने केला होता. त्यानंतर अमेरिकेने इस्रायल ते पर्शियन आखातापर्यंत बॉम्बर्स विमानांची गस्त पूर्ण करून या क्षेत्रातील आपल्या मित्रदेशांना आश्‍वस्त केल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, किमान २० अण्वस्त्रे तसेच क्रूझ् व इतर क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता एका ‘बी-५२’ बॉम्बर विमानामध्ये आहे. सब-सोनिक वेगाने प्रवास करणार्‍या या विमानांसह अमेरिकेने पर्शियन आखातात आण्विक पाणबुडी व विनाशिका देखील तैनात केल्या आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info