विषाणूंनी पछाडलेल्या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीमुळे जग धोक्यात आले आहे – अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांचा आरोप

विषाणूंनी पछाडलेल्या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीमुळे जग धोक्यात आले आहे – अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांचा आरोप

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘चीनची कम्युनिस्ट राजवट विषाणूंनी पछाडलेली आहे. चीनच्या संशोधकांनी गेल्या दशकभरात तब्बल दोन हजार नवे विषाणू शोधून काढले आहेत. जगातील इतर देशांना एवढ्या मोठ्या प्रमाणात विषाणूंचा शोध घेण्यासाठी तब्बल २०० वर्षे लागली होती. चीनचे संशोधक विषाणूंचा शोध घेत असताना सत्ताधारी राजवट त्याच्या सुरक्षेकडे मात्र लक्ष देत नाही आणि त्यामुळे संपूर्ण जग धोक्यात आले आहे’, असा आरोप अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला.

चीनी कम्युनिस्ट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना साथीचे मूळ चीनमध्येच असल्याचा आरोप करून त्याची जबर किंमत चीनला मोजणे भाग पडेल, असे सातत्याने बजावले होते. ट्रम्प प्रशासनातील इतर प्रमुख नेते व अधिकार्‍यांनीही कोरोनाव्हायरस चीनमधूनच आल्याचे सांगून त्यासंदर्भातील माहिती अमेरिकेकडे असल्याचे दावे केले होते. गेल्याच महिन्यात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) पथक चीनमध्ये चौकशीसाठी दाखल झाले असताना अमेरिकेने कोरोना साथीसंदर्भात असलेली महत्त्वपूर्ण माहिती उघड केली होती.

‘चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे चिनी लष्कराशी संबंध आहेत. २०१९ मध्ये या प्रयोगशाळेतील संशोधक वटवाघुळाशी निगडित कोरोनाव्हायरसवर प्रयोग करीत होते. हा व्हायरस जनुकीय पातळीवर सध्या पसरलेल्या कोरोनाव्हायरसशी ९६ टक्क्यांहून अधिक मिळताजुळता आहे. वुहान प्रयोगशाळेतील काही संशोधकही २०१९मध्ये आजारी पडले होते व त्यांच्यात सध्याच्या कोरोना रुग्णांप्रमाणे लक्षणे दिसून आली होती’, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला होता.

अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन व प्रशासनाने या मुद्यावर फारशी आग्रही भूमिका घेतलेली नाही. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने कोरोनाच्या मुद्यावर चीनला मोकळे सोडल्यानंतरही बायडेन प्रशासनाने नाराजी व्यक्त करण्यापलिकडे कसलेही संकेत दिलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी कोरोना साथीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा चीनवर केलेले आरोप लक्ष वेधून घेणारे ठरतात. पॉम्पिओ यांनी चीनवर केलेल्या आरोपांमध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे माजी संचालक युआन झिमिंग यांच्या लेखाचा संदर्भही दिला आहे.

‘चीनमध्ये अनेक जैविक प्रयोगशाळांची उभारणी होत आहे. या प्रयोगशाळांमधील जैविक सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. या प्रयोगशाळांमध्ये सुरू असलेल्या विषाणूंच्या संशोधनातून एखादी मोठी आपत्ती उद्भवू शकते’, असे झिमिंग यांनी २०१९ साली लिहिलेल्या लेखात म्हटले होते. ब्रिटनमधील एक तज्ज्ञ अँड्रिअस फुल्दा यांनीही, चीनच्या प्रयोगशाळांमधून विषाणू बाहेर जाणे ही काही दुर्मिळ बाब नसल्याचे बजावले होते. २००४ साली सार्सचा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून विषाणूंच्या शोधासाठी सुरू असलेले प्रयत्न व त्याचवेळी जैवसुरक्षेच्या बाबतीत असणारी निष्क्रियता याची किंमत जगाला मोजणे भाग पडत असल्याचा आरोप केला. यापुढे हे असेच कायम राहिलेले चालणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info