Breaking News

अमेरिका व युरोपच्या विरोधात चीन आणि रशियाची आघाडी

चीन आणि रशिया, आघाडी, सर्जेई लॅव्हरोव्ह, शीतयुद्ध, एकजूट, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ, TWW, Third World War

बीजिंग – ‘आपले विध्वंसक हेतू साधण्यासाठी अमेरिका शीतयुद्धाच्या काळासारख्या लष्करी-राजकीय आघाड्या नव्याने उभ्या करीत असून, संयुक्त राष्ट्रसंघावर आधारलेली जागतिक व्यवस्था निकालात काढत आहे. अशा काळात कायद्यावर आधारलेली आधुनिक व्यवस्था कायम राखण्यासाठी रशिया व चीनची एकजूट अत्यावश्यक ठरते, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी म्हटले आहे. लॅव्हरोव्ह सध्या चीनच्या दौर्‍यावर असून अमेरिकेबरोबर रशियाचे संबंध ताणले जात असताना, त्यांच्या या चीनभेटीला फार मोठे सामरिक महत्त्व आले आहे.

रशिया अमेरिकेचा शत्रू आहे आणि चीन अमेरिकेचे स्पर्धक आहे, अशी घोषणा बायडेन प्रशासनाने केली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची खुनी म्हणून संभावना केली. यावर रशियाकडून जहाल प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक असलेल्या नॅव्हॅल्नी यांना झालेल्या अटकेवरून अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. त्याचवेळी रशिया व जर्मनीमधील इंधनवाहिनी प्रकल्पावर निर्बंध लादण्याची धमकी बायडेन प्रशासनाने दिली आहे. बायडेन प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे युक्रेनने रशियाच्या विरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. युरोपमध्ये नाटो सक्रीय करून बायडेन प्रशासन पुन्हा एकदा रशियाला घेरण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत चीनच्या भेटीवर असलेल्या रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेचे हेतू विध्वंसक असल्याचा ठपका ठेवला.

चीन आणि रशिया, आघाडी, सर्जेई लॅव्हरोव्ह, शीतयुद्ध, एकजूट, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ, TWW, Third World War

अमेरिका शीतयुद्धाकाळातील लष्करी व राजकीय आघाड्या नव्याने उभ्या करीत असून याद्वारे संयुक्त राष्ट्रसंघप्रणित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा निकाल लावण्याच्या तयारीत आहे. आपले विध्वंसक हेतू पूर्णत्वास नेण्यासाठी अमेरिका आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या आपल्या डॉलरचा शस्त्रासारखा वापर करीत आहे, याकडे रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. म्हणूनच अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून रशिया व चीनने आपल्या चलनात व्यवहार करावे व इतर जागतिक चलनांचा वापर करावा, असे आवाहन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी चीनला सुचविले आहे. तसेच पाश्‍चिमात्यांच्या ‘पेमेंट सिस्टीम्स’चा वापर बंद करून रशिया व चीनने इतर पर्याय स्वीकारावेत, अशी मागणी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.

पाश्‍चिमात्य देश आपल्याला हवी असलेली व्यवस्था इतर देशांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सांगून रशिया व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त निवेदनात याला विरोध केला. तसेच अमेरिकेकडून लादण्यात येणार्‍या एकतर्फी निर्बंधांच्या विरोधात एकजूट करण्याचा निर्धार परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी व्यक्त केला आहे. सध्या रशियाचे युरोपिय महासंघाबरोबरील संबंध ठप्प झालेले आहेत. त्याचवेळी चीनबरोबरील रशियाचे संबंध वेगाने विकसित होत आहेत, याकडे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी लक्ष वेधले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info