नातांझ प्रकल्पातील स्फोटात हजारो सेंट्रिफ्यूजेस नष्ट झाले – इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍याची कबुली

नातांझ प्रकल्पातील स्फोटात हजारो सेंट्रिफ्यूजेस नष्ट झाले – इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍याची कबुली

सेंट्रिफ्यूजेस, स्फोट, नातांझ, अलीरेझा झकानी, अणुकार्यक्रम, इराण, सबस्टेशन, TWW, Third World War

तेहरान – रविवारी सकाळी नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या स्फोटामध्ये संवर्धनासाठी वापरण्यात येणारे हजारो सेंट्रिफ्यूजेस निकामी आणि नष्ट झाले आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाला बसलेला हा मोठा धक्का असल्याची कबुली इराणचे संसद सदस्य व माजी अधिकारी देत आहेत. पण इराणचे सरकार याबाबत बोलायला तयार नाही. नातांझमधील घटनेमुळे इराणचा अणुकार्यक्रम नऊ महिने मागे गेल्याचा इशारा अमेरिकेच्या वर्तमानपत्राने काही तासांपूर्वीच केला होता. पण इराणने हा दावाही खोडून काढला होता.

सेंट्रिफ्यूजेस, स्फोट, नातांझ, अलीरेझा झकानी, अणुकार्यक्रम, इराण, सबस्टेशन, TWW, Third World War

इराणी संसदेच्या रिसर्च सेंटरचे प्रमुख अलीरेझा झकानी यांनी सरकारसंलग्न वृत्तवाहिनीशी बोलताना, नातांझ अणुप्रकल्पात स्फोट घडविण्यात शत्रूदेश यशस्वी झाल्याची हताश प्रतिक्रिया यांनी दिली. रविवारच्या स्फोटात नातांझ अणुप्रकल्पातील हजारो सेंट्रिफ्यूजेस नष्ट झाले आहेत. या प्रकल्पातील काही साहित्यांमध्ये ३०० पौंड वजनाची स्फोटके होती. ही स्फोटके प्रकल्पातील डेस्कमध्ये ठेवण्यात आली होती. याचाच पुढे स्फोट झाला, असा दावा झकानी यांनी केला.

तर इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी प्रमुख फेरेयदून अब्बासी-दावानी यांनी देखील इराणी माध्यमांशी बोलताना, शत्रूदेशाच्या यंत्रणा आपल्या योजनेमध्ये यशस्वी ठरल्याचे सांगितले. नातांझ अणुप्रकल्पाचे मोठे नुकसान घडविण्याची अचूक योजना शत्रूने आखली होती व त्यात ते यशस्वी ठरले, अशी टीका दावानी यांनी केली.

सेंट्रिफ्यूजेस, स्फोट, नातांझ, अलीरेझा झकानी, अणुकार्यक्रम, इराण, सबस्टेशन, TWW, Third World War

नातांझ अणुप्रकल्पातील इलेक्ट्रिकल सबस्टेशन ५० मीटर खोल बसविण्यात आले होते. शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरही या सबस्टेशनचे नुकसान झाले नसते. पण या सबस्टेशनच्या डेस्कमध्ये स्फोटके पेरून संपूर्ण सबस्टेशन उद्ध्वस्त करण्याच्या योजनेत इराणचे शत्रू यशस्वी ठरल्याचा दावा दावानी यांनी केला. यासाठी इराणच्या सुरक्षा यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोपही दावानी यांनी केला.

दरम्यान, या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश इराणने दिले असून इराणमधीलच काहीजण यामध्ये सहभागी असल्याच आरोप इराणी वृत्तसंस्था करीत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info