Breaking News

रशिया खंबीरपणे आपल्या हितसंबंधांचे रक्षण करील – राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची ग्वाही

मॉस्को – दुसर्‍या महायुद्धात रशियाने जर्मनीच्या नाझी राजवटीचा पराभव केला होता. हा दिवस रशियात ‘व्हिक्टरी डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने राजधानी मॉस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लष्करी संचलनादरम्यान पुतिन यांनी रशिया कुठल्याही मुद्यावर माघार घेणार नसल्याचा संदेश अमेरिका व इतर पाश्‍चिमात्य देशांना दिला. त्याचवेळी रशियाविरोधी तसेच नाझी विचारसरणींच्या वाढत्या समर्थनावर रशियन राष्ट्राध्यक्षांनी कोरडे ओढले. तसेच रशिया खंबीरपणे आपल्या हितसंबंधांचे रक्षण करील, अशी ग्वाही यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली.

व्लादिमिर पुतिन, हितसंबंधांचे रक्षण, व्हिक्टरी डे, नाझी, ग्वाही, रशिया, TWW, Third World War

‘हजारो, लाखो शांतीप्रिय लोकांच्या रक्ताने माखलेल्या देशद्रोही व गुन्हेगारांचे समर्थन करण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे प्रयत्न होत आहेत. आपल्या श्रेष्ठत्वाच्या भ्रामक सिद्धांतांनी पछाडलेल्या नाझींच्या विचारसरणीला पुन्हा राबविण्याची तयारी सुरू आहे. वांशिक तसेच राष्ट्रीय वर्चस्वाच्या, ज्यूविरोधाच्या, रशियाचा द्वेष करणार्‍या घोषणांचा आवाज वाढत चालला आहे’, असा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला. इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका व इस्रायलमधले मतभेत तीव्र होऊ लागले आहेत. अशा काळात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केलेली ही विधाने लक्षवेधी ठरतात.

‘सोव्हिएत रशियाच्या जनतेने घेतलेली शपथ निष्ठेने पाळून आपल्या मातृभूमीचा बचाव केला. युरोपिय देशांची काळ्या प्लेगपासून सुटका केली. रशियाने सातत्याने आंतरराष्ट्रीय कायदे व नियमांचे पालन केले आहे. हे करतानाच रशिया आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी खंबीरपणे आपल्या हितसंबंधांचेही रक्षण करेल’, अशी ठाम ग्वाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली.

व्लादिमिर पुतिन, हितसंबंधांचे रक्षण, व्हिक्टरी डे, नाझी, ग्वाही, रशिया, TWW, Third World War

गेल्या काही महिन्यात रशिया व पाश्‍चात्य देशांमधील तणाव पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. अमेरिकने आपल्यावर झालेल्या सायबरहल्ल्यांमागे रशियाचा हात असल्याचा दावा करून निर्बंध लादले आहेत. त्याचवेळी पुतिन यांचे विरोधक असणार्‍या ऍलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावर झालेली कारवाई, ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनी व युक्रेनविरोधातील कारवायांच्या मुद्यावरूनही आक्रमक निर्णय घेतले आहेत.

युरोपिय देशांनीही नॅव्हॅल्नी प्रकरण व युक्रेनच्या मुद्यावर रशियाविरोधी भूमिका घेऊन निर्बंध लादले आहेत. त्याचवेळी रशियन अधिकार्‍यांवर हेरगिरीचा ठपका ठेऊन त्यांची हकालपट्टी करण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे रशिया व युरोपमधील संबंध चांगलेच ताणले गेले असून ते तुटले तर त्यासाठी युरोप जबाबदार असेल, असा इशारा रशियाने दिला आहे.

पाश्‍चात्यांबरोबर निर्माण झालेल्या या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी ‘व्हिक्टरी डे’चे निमित्त साधून हितसंबंधांबाबत दिलेली ग्वाही रशियाच्या आक्रमक धोरणाचे संकेत देणारी ठरते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info