- दोन महिन्यात 17 जिल्हे तालिबानच्या ताब्यात
- चार दिवसात शंभरहून अधिक अफगाणी जवान ठार
- बारा तासांमधील संघर्षात 25 जणांचा बळी
काबुल – तालिबानच्या दहशतवाद्यांनी गेल्या बारा तासात अफगाणिस्तानात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये 25 जणांचा बळी गेला. यामध्ये काबुलमधील लग्नसमारंभावर झालेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पाच जणांचा समावेश आहे. तर घोर प्रांतात तालिबानने चढविलेल्या हल्ल्यात 20 अफगाणी जवान मारले गेले. गेल्या चार दिवसात दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्या अफगाणी जवानांची संख्या शंभरावर गेली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानातील 17 जिल्ह्यांचा ताबा घेतल्याची बातमी आली आहे. अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू असताना तालिबानची ही मुसंडी लक्षवेधी ठरते.
अफगाणिस्तानात एकूण 403 जिल्हे आहेत. यापैकी 180हून अधिक जिल्ह्यांमध्ये अफगाण लष्कर आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू आहे. तर जवळपास 80 जिल्ह्यांचा तालिबानने ताबा घेतला असून अफगाण सरकारच्या नियंत्रणाखाली अजूनही 130 जिल्हे आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये तालिबानच्या हल्ल्यांची तीव्रता वाढली असून बघलान, बदघीस या प्रांतात अफगाणी लष्करासाठी तालिबानसमोर टिकून राहणे अवघड बनले आहे.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/taliban-significantly-expands-control-in-afghanistan/