अमेरिकेकडून युक्रेनला 15 कोटी डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याची घोषणा – काऊंटर-ड्रोन सिस्टिम्सचा समावेश

$150 million

रक्षा सहायतावॉशिंग्टन/किव्ह/मॉस्को – अमेरिकेच्या संरक्षण विभागाने युक्रेनला 15 कोटी डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली आहे. त्यात ‘काऊंटर ड्रोन सिस्टिम्स’सह ‘काऊंटर आर्टिलरी रडार’, ‘सिक्युअर कम्युनिकेशन गिअर’ व ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’चा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात अमेरिकेने युक्रेनला संरक्षणसहाय्य जाहीर करण्याची ही दुसरी वेळ आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेणार असून, या पार्श्‍वभूमीवर युक्रेनला संरक्षणसहाय्य जाहीर होणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर रशिया हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर क्रिमिआच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेऊन अमेरिका रशियाच्या ताब्याला कधीही मान्यता देणार नसल्याचा इशाराही दिला होता. गेल्याच महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी, रशियाच्या आक्रमक हालचालींविरोधात अमेरिका युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभा व युक्रेनला मोठ्या प्रमाणावर संरक्षणसहाय्य पुरविण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. शुक्रवारी संरक्षण विभागाने केलेली घोषणा त्याचाच भाग असल्याचे दिसत आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/us-pentagon-announces-usd-150-million-security-assistance-to-ukraine/