कोरोनाव्हायरसचे मूळ दडविण्यासाठी चिनी संशोधकांनी महत्त्वाची माहिती ‘डिलिट’ केली

अमेरिकेतील आघाडीच्या संशोधकाचा आरोप

वॉशिंग्टन/बीजिंग – कोरोनाव्हायरस नक्की केव्हापासून व कुठून फैलावला याचे मूळ शोधता येऊ नये म्हणून चीनच्या संशोधकांनी वुहानमधील रुग्णांची महत्त्वाची माहिती डिलिट केल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेतील आघाडीचे संशोधक जेस ब्लूम यांनी एका रिसर्च पेपरमध्ये यासंदर्भातील दावा केला. या दाव्यामुळे, कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतच झाला असावा या शक्यतेला अधिकच बळ मिळत आहे.

Chinese researchers, संशोधककोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाला, हे सांगणार्‍या ‘वुहान लॅब लीक थिअरी’चा मुद्दा गेल्या काही महिन्यात ऐरणीवर आला आहे. अमेरिका व युरोपसह जगातील अनेक देशांनी ही थिअरी उचलून धरण्यास सुरुवात केली असून त्यासंदर्भातील विविध प्रकारची माहितीही समोर येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसातच अमेरिकी प्रयोगशाळा तसेच युरोपियन संशोधकांचे अहवाल प्रसिद्ध झाले असून त्यात कोरोनाव्हायरस वुहान लॅबमध्ये तयार झाल्याच्या दाव्यांना दुजोरा देणारी माहिती आहे. त्यापाठोपाठ आता जेस ब्लूम यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीची भर पडली आहे.

अमेरिकेच्या ‘फ्रेड हचिसन कॅन्सर रिसर्च सेंटर’मध्ये कार्यरत असणारे प्राध्यापक जेस ब्लूम गेले काही महिने कोरोनाव्हायरससंदर्भात संशोधन करीत आहेत. हे संशोधन करताना त्यांना वुहानमधील काही संशोधकांनी एका आंतरराष्ट्रीय ‘डेटाबेस’वर काही रुग्णांसंदर्भातील माहिती ठेवल्याचे समजले. मात्र अधिक खोलात तपास केला असता, डिसेंबर 2019 पूर्वीच्या रुग्णांसंदर्भातील शास्त्रीय माहिती नष्ट केल्याचे दिसून आले. ही माहिती कोरोनाचे मूळ चीनने सांगितल्याप्रमाणे ‘सी फूड मार्केट’ नाही तर वेगळी जागा असावी, याकडे निर्देश करणारे होते असा दावा ब्लूम यांनी केला आहे.

Chinese researchers, संशोधकब्लूम यांचा हा दावा ‘वुहान लॅब लीक थिअरी’ला दुजोरा देत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने यासंदर्भातील माहिती समोर येत असल्याकडेही संशोधक तसेच माध्यमांनी लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी, चीनने कोरोनाच्या उगमासंदर्भातील सारे पुरावे नष्ट केले असतील असा संशय व्यक्त केला होता.

दरम्यान, अमेरिकेत ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीने केलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल 60 टक्के अमेरिकी नागरिकांनी ‘वुहान लॅब लीक थिअरी’ बरोबर असल्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. कोरोनाच्या साथीमुळे अमेरिकी जनतेच्या जीवनशैलीवर दूरगामी परिणाम झाल्याचे मतही 50 टक्के नागरिकांनी नोंदविल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ‘द हिल-हॅरिसएक्स’ने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 83 टक्के अमेरिकी मतदारांनी वुहान लॅब प्रकरणी चीनवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी केल्याचे समोर आले होते.

‘वुहान लॅब थिअरी’च्या मुद्यावर ट्रम्प यांची सत्ताधार्‍यांवर टीका

संशोधकवॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, 2019 साली चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीचे मूळ वुहानमध्ये असल्याचा उल्लेख सर्वात आधी केला होता. या मुद्यावरून त्यांना धारेवर धरणार्‍या डेमोक्रॅट्सवर ट्रम्प यांनी टीकास्त्र सोडले आहे. माझ्यावर आरोप करून वुहान लॅब थिअरी खोटी व वंशद्वेषी ठरविण्यामागे राजकीय हेतू होते, असा दावा माजी राष्ट्राध्यक्षांनी केला.

वुहान लॅबच्या मुद्यावरून मला खोटे ठरविणारे डेमोक्रॅट्स आता त्याचे क्रेडिट घेत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. यापूर्वी केवळ ट्रम्प वुहान थिअरी मांडत असल्याने त्यांनी ती नाकारली व हा ‘कॅन्सल कल्चर’चा भाग असावा, असा ठपका माजी राष्ट्राध्यक्षांनी ठेवला. चीनने ‘वुहान लॅब लीक थिअरी’चे पुरावे नष्ट केले असावेत, असे सांगून काही झाले तरी चीनकडून नुकसानभरपाई घ्यायलाच हवी, अशी मागणीही ट्रम्प यांनी केली आहे.

English  हिंदी 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info