मॉस्को – रशियन सरकारकडे असलेल्या राखीव गंगाजळीतून उभारण्यात आलेल्या ‘नॅशनल वेल्थ फंड’मधील अमेरिकी डॉलरचा हिस्सा शून्य करण्यात आला आहे. जानेवारी 2021मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘नॅशनल वेल्थ फंड’मधील 35 टक्के गुंतवणूक अमेरिकी डॉलर्समध्ये होती. मात्र आता या फंडमधून अमेरिकी डॉलरची कायमस्वरुपी हकालपट्टी करण्यात आली असून त्याऐवजी युआन, युरो व सोन्याचा हिस्सा वाढविण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही वर्षांपूर्वी ‘डिडॉलरायझेशन’ची प्रक्रिया सुरू केली होती. ‘नॅशनल वेल्थ फंड’मधील हिस्सा शून्यावर आणणे त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरतो.
दोन महिन्यांपूर्वी रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन यांनी, ‘नॅशनल वेल्थ फंड’ला सोन्यात गुंतवणूक करण्यास मंजुरी देणारा आदेश जारी केला होता. त्यानंतर जून महिन्यात रशियाचे अर्थमंत्री अँतोन सिल्युआनोव्ह यांनी, ‘नॅशनल वेल्थ फंड’मधून अमेरिकी डॉलर पूर्णपणे हटविण्याची घोषणा केली होती. ‘पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत नॅशनल वेल्थ फंडमधील डॉलरचा हिस्सा शून्यावर आणण्यात येईल. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जातील’, असे अर्थमंत्री अँतोन सिल्युआनोव्ह यांनी म्हटले होते.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/depreciation-of-us-dollars-from-russia-national-wealth-fund/