रशिया, चीन व इराणच्या गुप्तहेरांपासून ब्रिटनच्या सुरक्षेला गंभीर धोका

- ब्रिटनचे गुप्तचर प्रमुख केन मॅक्कलम यांचा इशारा

गंभीर

लंडन/मॉस्को/बीजिंग – रशिया, चीन व इराणकडून होणार्‍या हेरगिरीपासून ब्रिटनच्या सुरक्षेला धोका आहे. हा धोका दहशतवादाच्या धोक्याइतकाच गंभीर ठरतो, असा इशारा ब्रिटनचे गुप्तचर प्रमुख केन मॅक्कलम यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच लंडन युनिव्हर्सिटीवर इराणी हॅकर्सच्या गटाने सायबरहल्ला चढवून माहिती चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. या पार्श्‍वभूमीवर मॅक्कलम यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेत आहे.

बुधवारी झालेल्या थेम्स हाऊसमधील मुख्यालयात झालेल्या बैठकीत ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय5’चे प्रमुख केन मॅक्कलम यांनी ब्रिटनच्या जनतेला सावधगिरीचा इशारा दिला. सिरिया व अफगाणिस्तानातून येणार्‍या दहशतवाद्यांचा धोका आहेच, पण त्याहून महत्त्वाची गरज रशिया, चीन व इराणपासून असणारा धोका ओळखण्याची आहे, असे मॅक्कलम यांनी बजावले. त्याचववेळी ब्रिटनला असणार्‍या धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही आमची क्षमता वाढवित असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘गेली दोन दशके गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादविरोधी मोहिमेवर अधिक भर दिला होता. या काळात देशाला असलेल्या धोक्यांकडील लक्ष कमी झाले होते’, अशी कबुलीही मॅक्कलम यांनी यावेळी दिली.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/serious-threat-to-britains-security-from-spies-from-russia-china-and-iran/