टोकिओ/तैपेई/बीजिंग – तैवानच्या क्षेत्रातील स्थैर्य जपानसाठी आवश्यक असल्याचा दावा करणार्या जपानने चीनला अजून एक धक्का दिला आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘व्हाईट पेपर’ अर्थात श्वेतपत्रिकेत ‘वन चायना पॉलिसी’पासून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. श्वेतपत्रिकेत चीनसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांमध्ये चीनच्या नकाशाबरोबरच तैवान दाखविण्यात आलेला नाही. याचा अर्थ जपान तैवानला स्वतंत्र देश मानत आहे, असा असल्याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.
मंगळवारी जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी जपानसमोर असलेली सुरक्षाविषयक आव्हाने व संरक्षणसज्जता यांचा उल्लेख असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. यात तैवानच्या सुरक्षेचा व स्थैर्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला होता. ‘तैवानच्या सुरक्षेला आव्हान देणार्या चीनच्या हालचाली धोकादायक असून, या क्षेत्रात स्थैर्य निर्माण करणे जपानची सुरक्षा व आंतरराष्ट्रीय स्थैर्यासाठी आवश्यक आहे’, या शब्दात जपानच्या संरक्षण मंत्रालयाने तैवानच्या सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले होते.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/japan-ready-to-reject-one-china-policy/