…तर आम्ही चीनमधील ‘ताईशान’ अणुप्रकल्प बंद केला असता – फ्रेंच कंपनीचा इशारा

‘ताईशान’

पॅरिस/बीजिंग – चीनच्या दक्षिण भागातील ग्वांगडाँग प्रांतातील ‘ताईशान’ अणुप्रकल्पात निर्माण झालेली समस्या अत्यंत गंभीर होती. शक्य असते तर आम्ही हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला असता, असा इशारा फ्रेंच कंपनी ‘ईडीएफ’ने दिला. गेल्या महिन्यात ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. पण चिनी यंत्रणांनी सारे काही आलबेल असल्याचे निवेदन देऊन हे प्रकरण दडपण्याच प्रयत्न केला होता. मात्र फ्रेंच कंपनी ‘ईडीएफ’ने दिलेल्या इशार्‍यामुळे चिनी राजवटीची लपवाछपवीचे धोरण पुन्हा एकदा उघडे पडले आहे.

चीनच्या दक्षिण भागातील ग्वांगडाँग प्रांतात ‘ताईशान’ अणुप्रकल्प असून त्यात दोन अणुभट्ट्या कार्यरत आहेत. हा प्रकल्प चीन व फ्रान्सने संयुक्तरित्या उभारला आहे. फ्रान्सच्या ‘फ्रॅमअ‍ॅटम’ या कंपनीने प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून देखभालीचीही जबाबदारी या कंपनीकडेच आहे. ही कंपनी जगातील आघाडीची अणुऊर्जा कंपनी असणार्‍या ‘ईडीएफ’ या फ्रेंच कंपनीची उपकंपनी आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/so-we-would-have-shut-down-the-taishan-nuclear-plant-in-china/