टोकिओ/तैपेई/बीजिंग – ‘हाँगकाँगमध्ये जे घडले त्याची पुनरावृत्ती तैवानमध्ये कधीही होता कामा नये’, असे जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी बजावले आहे. यावेळी त्यांनी चीनकडून साऊथ चायना सी व ईस्ट चायना सीमधील ‘जैसे थे’ स्थिती बदलण्यासाठी एकतर्फी प्रयत्न चालू असल्याबद्दल चिंताही व्यक्त करण्यात आली. अॅबेंकडून करण्यात आलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चीनकडून प्रतिक्रिया उमटली असून, अमेरिका व जपानने तैवानमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला आहे.
‘जपान-रिपब्लिक ऑफ चायना डायट मेंबर्स कन्सल्टेटिव्ह कौन्सिल’ या अभ्यासगटाने ‘ट्रायलॅटरल स्ट्रॅटेजिक डायलॉग’चे आयोजन केले होते. या सेमिनारमध्ये अमेरिका व जपानसह तैवानचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जपानचे माजी पंतप्रधान अॅबे अभ्यासगटाचे सल्लागार म्हणून कार्यरत असून तेही या डायलॉगमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी तैवानची तुलना हाँगकाँगशी करीत चीनच्या राजवटीकडून सुरू असलेल्या कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/what-happened-in-hong-kong-should-not-be-repeated-in-taiwan/