डोन्बाससह मध्य व पश्चिम युक्रेनमध्ये रशियाकडून क्षेपणास्त्रांचे तीव्र हल्ले

पश्चिम युक्रेनमध्ये

मॉस्को/मारिपोल – रशियाकडून पूर्व युक्रेनमधील डोन्बास क्षेत्रासह मध्य तसेच पश्चिम युक्रेनमध्ये जोरदार क्षेपणास्त्र हल्ले चढविण्यात आले. या क्षेपणास्त्रहल्ल्यांमध्ये युक्रेनमधील परदेशी शस्त्रांच्या कोठारांसह रेल्वे स्टेशन्स, वीजपुरवठा केंद्रे व युक्रेनी लष्कराच्या ठिकाणांचा समावेश आहे. त्याचवेळी मारिपोलमधील ‘अझोव्हस्टॅल’ फॅक्टरी परिसरात रशियाकडून ‘थर्मोबॅरिक वेपन्स’चा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, रशियाने युरोपातील कॅलिनिनग्रॅड या संरक्षणतळावर अण्वस्त्रहल्ल्यांचा सराव केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

युक्रेनवरील कारवाईचा दुसरा टप्पा सुरू केल्यानंतर रशियन संरक्षणदले अधिक आक्रमक झाली आहेत. युक्रेनवर होणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता व व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. यात क्षेपणास्त्रहल्ल्यांवर भर देण्यात आला असून ‘कॅलिबर’ क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल्स प्रकारात मोडणाऱ्या या क्षेपणास्त्रांचा पल्ला साडेचार हजार किलोमीटर्सपर्यंत आहे. युद्धनौका, पाणबुडी तसेच विमानातून मारा करण्याची क्षमता असणाऱ्या या क्षेपणास्त्रांचा वापर यापूर्वी सिरिया युद्धात मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता.

पश्चिम युक्रेनमध्ये

युक्रेनमधील मोहिमेला सुरुवात करताना रशियन संरक्षणदलांनी कॅलिबरचा वापर केला होता. मात्र गेल्या काही दिवसात रशियन नौदलाकडून होणारा कॅलिबर क्षेपणास्त्रांचा मारा अधिक प्रभावी ठरत असल्याचे समोर येत आहे. मंगळवापरपासून रशियन नौदल व हवाईदलाने जवळपास 30हून अधिक कॅलिबर क्षेपणास्त्रे डागल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यांमध्ये डोन्बास क्षेत्रातील युक्रेनी लष्कराच्या जागांसह मध्य तसेच पश्चिम युक्रेनचा समावेश आहे. पश्चिम युक्रेनमधील लिव्ह शहरावर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. शहरातील रेल्वे स्टेशन्स व वीजपुरवठा केंद्रांना लक्ष्य करण्यात आले.

पश्चिम युक्रेनमध्ये

डोन्बास क्षेत्रातील पोपास्ना, क्रॅमाटोर्स्क या शहरांवर जोरदार क्षेपणास्त्रहल्ले करण्यात आले. दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह प्रांतात केलेल्या हल्ल्यात 15 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. रशियन लष्कराकडूनही हल्ल्यांची तीव्रता वाढविण्यात आली असून ‘आर्टिलरी फायर’मध्ये युक्रेनचे 600 जवान मारल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. युक्रेनी लष्कराच्या इंधन डेपो तसेच शस्त्रकोठारांनाही लक्ष्य करण्यात आले. रशियाने मारिपोलमधील ‘अझोव्हस्टॅल’ फॅक्टरी परिसरातही हल्ले चढविल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यांसाठी रशियाने थर्मोबॅरिक वेपन्स’चा वापर केल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, बुधवारी रशियाचे मिलिटरी हेलिकॉप्टर फिनलंडच्या हद्दीत घुसल्याची घटना समोर आली आहे. रशियन हेलिकॉप्टरने फिनलंडच्या हद्दीत दोन ते तीन मैल प्रवास केल्याचे सांगण्यात येते. फिनलंडने नाटोत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर रशियाने फिनलंडला परिणामांसाठी तयार राहण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर रशियन हेलिकॉप्टर्सच्या हालचाली लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतात.

रशियन लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्येमागे अमेरिकी यंत्रणांचा हात

वॉशिंग्टन/मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धात रशियाचे दहाहून अधिक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मारल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. या रशियन अधिकाऱ्यांच्या मृत्यूमागे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकी यंत्रणांनी युद्धादरम्यान युक्रेनला रशियन अधिकाऱ्यांच्या हालचालींची अचूक माहिती पुरविल्याचे उघड झाले. अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने हा यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले.

पश्चिम युक्रेनमध्येदोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धात रशियाच्या जवळपास 12 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात मेजर तसेच जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पूर्व युक्रेन तसेच किव्ह व मारिपोलजवळ झालेल्या हल्ल्यांमध्ये हे अधिकारी मारले गेले आहेत. रशियन अधिकाऱ्यांना अचूक लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा युक्रेनला सातत्याने माहिती पुरवित असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देत असल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने म्हटले आहे.
अमेरिकेच्या या कारवायांची माहिती असल्याचे रशियाने म्हटले आहे. मात्र अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ने हे दावे फेटाळले आहेत.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info