इराण आखाती देशांवर नव्या हल्ल्याच्या तयारीत

- मोसादच्या प्रमुखांचा इशारा

जेरूसलेम – आखातातील देशांवर नव्याने हल्ले चढविण्याची योजना इराणने आखली आहे. त्याचबरोबर इराण रशियाला अतिप्रगत शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत आहे. इराणचे हे इरादे आखातासह जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरतील, असा इशारा इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी दिला. दरम्यान, रशियाला शस्त्रसज्ज करण्याबाबत अमेरिका व युरोपिय देशांनी केलेले आरोप इराणने याआधीच फेटाळले होते.

आखाती

पाश्चिमात्य देशांचे लक्ष रशिया-युक्रेन युद्धाकडे लागलेले असताना इराण वेगाने आपल्या आण्विक व लष्करी हालचाली करीत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. जगभरात हेरगिरीमध्ये आघाडीवर असलेली इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी इराणच्या आगामी हेतूंबाबत पाश्चिमात्य तसेच आखाती देशांना सावध केले. इराणचे हेतू चांगले नसल्याचा दावा मोसादच्या प्रमुखांनी केला. इराण रशियाला अतिप्रगत शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत राहणार आहे. याच्या मोबदल्यात रशिया देखील इराणच्या अणुकार्यक्रमाला मदत करील, याकडे बार्नी यांनी लक्ष वेधले. याआधीच इराणच्या अणुप्रकल्पांतील संशयास्पद हालचालींवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने चिंता व्यक्त केली होती. इराणने संवर्धित युरेनिअमची संख्या मर्यादेपलीकडे नेली असून यामुळे इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचल्याचा दावा आयोगाने केला होता.

आखाती

तर तिसऱ्या इशाऱ्यामध्ये बार्नी यांनी इराणपासून आखाती देशांच्या सुरक्षेला धोका असल्याचे स्पष्ट केले. येत्या काळात इराण आखाती देशांवर नव्याने हल्ले चढवू शकतो, असे बार्नी यांनी बजावले. एका हाताने इराण अणुऊर्जा आयोगाबरोबरील बैठकीसाठी आपल्या अधिकाऱ्यांना व्हिएन्ना येथे रवाना करतो, तर दुसऱ्या हाताने जगभरातील निष्पाप नागरिकांची हत्या घडविण्यासाठी दहशतवादी रवाना करीत असल्याचा आरोप बार्नी यांनी केला.

याआधी २०१९ साली सौदीच्या पूर्वेकडील इंधन प्रकल्पात झालेल्या ड्रोन हल्ल्याची जबाबदारी येमेनमधील हौथी बंडखोरांनी घेतली होती. पण या ड्रोन हल्ल्यासाठी इराणच जबाबदार असल्याचा आरोप सौदीने केला होता. त्यानंतर सौदीने येमेनमध्ये इराणने उभारलेले ड्रोन्सचे तळ उद्ध्वस्त केले होते. यामुळे सौदी व इराणमध्ये वाद पेटला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info