किव्ह – युक्रेनची राजधानी किव्हनजिक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये युक्रेनच्या दोन मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. सदर हेलिकॉप्टर ‘युरोकॉप्टर’ प्रकारातील असून युक्रेन सरकारच्या आपत्कालिन सेवांचा भाग होते, असे सांगण्यात येते. हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे घातपात असू शकतो, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
राजधानी किव्हचा भाग असलेल्या ‘ब्रोव्हरी’ या उपनगरातील एका किंडरगार्टन शाळेजवळ ही दुर्घटना घडली. दुर्घटनेच्या वेळेस हेलिकॉप्टरमध्ये नऊ जण हेोते, असे सांगण्यात येते. यात युक्रेनचे अंतर्गत सुरक्षामंत्री डेनिस मोनॅस्टिर्स्की, उपसुरक्षामंत्री येव्हहेन येनिन व वरिष्ठ अधिकारी युरा ल्युबकोविच यांचा समावेश होता. हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला असून किंडरगार्टन शाळेतील सुमारे दहा मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेवर युक्रेनसह अमेरिका व युरोपिय देशांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |