रशियाचे राजधानी किव्हसह डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतात क्षेपणास्त्र हल्ले

- डोनेत्स्क प्रांतातील हल्ल्यात युक्रेनचा २०० टन शस्त्रसाठा उद्ध्वस्त केल्याचा दावा

मॉस्को/किव्ह – रशियाने सोमवारी पहाटे युक्रेनची राजधानी किव्हसह डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतात जबरदस्त क्षेपणास्त्र हल्ले चढविले. यात युक्रेनी लष्कराच्या ‘लॉजिस्टिक हब’सह कमांड पोस्ट नष्ट झाल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाने केला. त्याचवेळी डोनेत्स्क प्रांतात केलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये युक्रेनी लष्कराचा तब्बल २०० टन शस्त्रसाठा उद्ध्वस्त केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. गेल्या काही दिवसात रशियन फौजांनी क्षेपणास्त्रहल्ल्यांची व्याप्ती पुन्हा एकदा वाढविण्यास सुरुवात केल्याचे सोमवारच्या हल्ल्यांवरून दिसून आले.

डिनिप्रोपेट्रोव्हस्क

सोमवारी पहाटे रशियाच्या लढाऊ विमानांनी मध्य युक्रेनमधील डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतात जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले. डिनिप्रो शहर तसेच पावलोऱ्हाड शहराला यावेळी लक्ष्य करण्यात आले. यावेळी या भागात असलेले युक्रेनी लष्कराचे ‘लॉजिस्टिक हब’ नष्ट झाल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी डिनिप्रो व नजिकच्या भागातील वीज केंद्रांचेही नुकसान झाले असून वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रशियाच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली.

डिनिप्रोपेट्रोव्हस्क

डिनिप्रोपेट्रोव्हस्कबरोबरच युक्रेनची राजधानी किव्हला देखील लक्ष्य करण्यात आले. मात्र राजधानी किव्हवरील क्षेपणास्त्रहल्ले ‘एअर डिफेन्स’ यंत्रणांनी परतवून लावल्याचा दावा युक्रेनने केला. डिनिप्रोपेट्रोव्हस्क व किव्हवर जवळपास १८ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या चार दिवसात रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रहल्ले करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी शुक्रवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात २०हून अधिक जणांचा बळी गेला होता.

डिनिप्रोपेट्रोव्हस्क

क्षेपणास्त्रहल्ल्यांपाठोपाठ रशियाने डोन्बास क्षेत्रातील अनेक भागांमध्ये रॉकेटस्‌‍ व तोफांचा मोठा मारा केला. डोन्बासमधील क्रॅमाटोर्स्क शहरात रशियन फौजांनी केलेल्या हल्ल्यात युक्रेनी लष्कराचा तब्बल २०० टन शस्त्रसाठा नष्ट झाल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाने केला. तर दक्षिणेकडील खेर्सन प्रांतात केलेल्या तोफांच्या माऱ्यात काही जणांचा बळी गेल्याची माहिती युक्रेनने दिली आहे.

दरम्यान, बाखमत शहरात सुरू असलेल्या संघर्षात रशियन फौजांनी नवा भाग ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियाने शहरातील जवळपास ९० टक्के क्षेत्रावर नियंत्रण मिळविल्याचे सांगण्यात येते. मात्र शहराच्या पश्चिमेकडील भाग व युक्रेनच्या चॅसिव्ह यार शहराला जोडणारा रस्ता यावर अजूनही युक्रेनचे नियंत्रण असल्याचे युक्रेनने स्पष्ट केले. युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी बाखमतची लढाई दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत चालल्याचा दावा केला आहे.

रशियाच्या ब्रिआंस्क प्रांतात घडविलेल्या घातपातात मालगाडी घसरली

डिनिप्रोपेट्रोव्हस्क

मॉस्को/किव्ह – युक्रेनसमर्थक गटाने रशियाच्या ब्रिआंस्क प्रांतात घडविलेल्या घातपातात एक मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. रशियन प्रमाणवेळेनुसार सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात मालगाडीचे डबे घसरून त्याला आग लागल्याचे सांगण्यात येते. या मालगाडीतून रशियन लष्करासाठी रणगाडे पाठविण्यात येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘आयईडी’ स्फोटकांच्या सहाय्याने रुळावर घडविलेल्या स्फोटामुळे मालगाडी घसरल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

मालगाडीच्या घसरण्यापाठोपाठ सेंट पीटर्सबर्ग भागात युक्रेन समर्थक गटांनी वीज वाहून नेणाऱ्या केबल्स उद्ध्वस्त केल्याचेही उघड झाले. यामुळे काही भागांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info