युक्रेनची राजधानी किव्हसह ओडेसा व झॅपोरिझिआवर रशियन फौजेचे मोठे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले

- नव्या वर्षातील सर्वात प्रखर मारा असल्याचा युक्रेनचा दावा

मॉस्को/किव्ह – बुधवारी क्रेमलिनवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना रशिया जबर प्रत्युत्तर देईल, असा इशारा रशियन प्रवक्त्यांनी दिला होता. त्याला अवघे काही तास उलटत असतानाच रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी किव्हसह ओडेसा व झॅपोरिझिआवर मोठा क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ला चढविला. 2023 मध्ये रशियाने राजधानी किव्ह व नजिकच्या भागावर चढविलेला हा सर्वात प्रखर हल्ला होता, असा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 12 तासांमध्ये दक्षिण रशियातील दोन इंधनप्रकल्पांवर ड्रोनहल्ले झाल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले.

युक्रेनची राजधानी

बुधवारी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे निवासस्थान व कार्यालय असणाऱ्या ‘क्रेमलिन’वर ड्रोन हल्ले झाले होते. हे ड्रोन हल्ले दहशतवादी हल्ल्यांच्या भाग असून युक्रेनने अमेरिकेच्या निर्देशांवरून हे हल्ले घडविल्याचा आरोप रशियन प्रवक्ते व नेत्यांनी केला होता. हा आरोप करतानाच रशिया या हल्ल्याला कधीही व कुठेही प्रत्युत्तर देईल, असा इशाराही देण्यात आला होता.

युक्रेनची राजधानी

त्यानंतर काही तासांमध्येच रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी किव्हसह ओडेसा शहर व झॅपोरिझिआ प्रांताला लक्ष्य केले. मायकोलेव्ह, किरोवोहराड, डिनिप्रोपेट्रोव्हस्क या प्रांतांमध्येही ड्रोन हल्ले झाल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात क्षेपणास्त्रांसह आत्मघाती ड्रोन्सचा वापर करण्यात आला. युक्रेनसह पाश्चिमात्य यंत्रणा व माध्यमांनी केलेल्या दाव्यांनुसार रशियाने जवळपास 40 क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा मारा केला. राजधानी किव्हनजिक शस्त्र कारखाना उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियन माध्यमांनी केला.

युक्रेनची राजधानी

ओडेसा शहरावर तब्बल 18 आत्मघाती ड्रोन्सचा मारा करण्यात आला. यातील काही ड्रोन्स युक्रेनी यंत्रणांनी पाडल्याचा दावा सूत्रांनी केला. झॅपोरिझिआ प्रांतात एस-300 क्षेपणास्त्रांचे हल्ले करण्यात आले. राजधानी किव्हसह इतर भागांमध्ये झालेले हल्ले हे नव्या वर्षातील सर्वात मोठे हल्ले असल्याचे युक्रेनच्या यंत्रणांकडून सांगण्यात आले. जवळपास तीन ते चार तास रशियाकडून हल्ले चालू होते, अशीही माहिती युक्रेनी माध्यमांनी दिली.

रशियाकडून हे हल्ले होत असतानात युक्रेननेही रशियातील दोन इंधनप्रकल्पांना लक्ष्य केल्याचे समोर येत आहे. दक्षिण रशियामधील रोस्तोव्ह तसेच क्रास्नोडार प्रांतातील इंधन प्रकल्पांवर ड्रोन हल्ले झाले. यात इंधनाच्या टाक्यांना आग लागल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून युक्रेनने रशियातील इंधन प्रकल्पांना सातत्याने लक्ष्य केले आहे. इंधनप्रकल्पांव्यतिरिक्त रशियन रेल्वेला लक्ष्य करण्याच्याही दोन घटना घडल्या आहेत. रशियातील पायाभूत सुविधांना लक्ष्य करून लष्कराचे मनोधैर्य खच्ची करण्याचा हेतू यामागे असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, बुधवारी क्रेमलिनवर झालेल्या ड्रोन हल्ल्यासंदर्भात रशियाने केलेले आरोप अमेरिकेने फेटाळले आहेत. रशियाच्या प्रवक्त्यांनी केलेले आरोप मूर्खपणाचे आहेत, असे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी सांगितले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info