Breaking News

अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी पडझड

बीजिंग – चीनमधील गुंतणूक नीचांकी पातळीवर आली आहे. चीनचे औद्योगिक उत्पादनही घटले आहे. देशांतर्गत मागणी पहिल्यांदाच घसरणीचा कल दाखवित आहे. त्याचवेळी पायाभूत सुविधांवरील चीनच्या खर्चातही कपात झाली आहे. अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापारयुद्धात चीनच्या बलाढ्य अर्थव्यवस्थेची पिछेहाट होत आहे, हे या सार्‍या गोष्टींमुळे उघड झाले आहे. पुढच्या काळात चीनवर कोसळणार्‍या आर्थिक संकटाची ही चाहूल असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

अर्थव्यवस्था, पडझड, विकासदर, अमेरिका, व्यापारयुद्ध, ww3, चीन, नॅशनल स्टॅटिस्टिक्स ब्युरो

अमेरिकेने चीनमधून होणार्‍या निर्यातीला लक्ष्य करून १०० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवरील आयातकर २५ टक्क्यांपर्यंत वाढविला होता. चीननेही अमेरिकन उत्पादनांवर कर वाढवून त्याला उत्तर दिले होते. पण अमेरिकेने ५०० अब्ज डॉलर्सच्या चिनी निर्यातीवर आयातकर वाढविण्याची घोषणा करून, हे व्यापारयुद्ध अधिकच तीव्र होणार असल्याची जाणिव चीनसह सार्‍या जगाला करून दिली. याचे दडपण चिनी अर्थव्यवस्थेवर पडल्याचे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. प्रचंड क्षमता असलेली चीनची बलाढ्य अर्थव्यवस्था तणावाखाली आली असून चीनने नुकतीच जाहीर केलेली आकडेवारी हेच दाखवून देत आहे.

जुलै महिन्यात चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरल्याची माहिती समोर आली होती. एप्रिल ते जून या तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली असून आर्थिक विकास दर ६.७ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. हा विकास दर २०१६ सालानंतरचा नीचांक असून जानेवारी ते मार्च या कालावधीत ६.८ टक्के विकासदराची नोंद झाली होती. चीनच्या या नव्या घसरणीमागे औद्योगिक उत्पादन व गुंतवणुकीतील घसरण हे घटक असल्याचे सांगण्यात आले होते. चीनच्या ‘नॅशनल स्टॅटिस्टिक्स ब्युरो’कडून ही माहिती जाहीर करण्यात आली होती.

त्यापाठोपाठ चीनच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असलेल्या इतर क्षेत्रांची आकडेवारीही समोर आली असून चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी पडझड सुरू झाल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटक म्हणून ओळखण्यात येणार्‍या औद्योगिक उत्पादनात फक्त सहा टक्के वाढ नोंदविण्यात आली असून यापूर्वी ‘नॅशनल स्टॅटिस्टिक्स ब्युरो’ने वर्तविलेल्या भाकितापेक्षा ती ०.३ टक्क्यांनी कमी आहे.

चीनमध्ये होणार्‍या गुंतवणुकीला सर्वात मोठा फटका बसला आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूक फक्त ५.५ टक्केच वाढली असून हा गेल्या दोन दशकातील नीचांक ठरला आहे. चीनच्या सत्ताधार्‍यांकडून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पातील गुंतवणुकही घटली असून ती सहा टक्क्यांखाली गेल्याचे ‘नॅशनल स्टॅटिस्टिक्स ब्युरो’च्या आकडेवारीतून समोर आले. चिनी जनतेकडून होणारी अंतर्गत मागणीही घटून नऊ टक्क्यांखाली गेली आहे.

जुलै महिन्यात चीनच्या नागरी भागांमधील बेकारीचा दरही पाच टक्क्यांवर गेल्याचे सांगण्यात येते. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या सर्वच क्षेत्रांमध्ये सुरू असलेली ही घसरण चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याचे संकेत मानले जातात. काही अर्थतज्ज्ञ तसेच विश्‍लेषकांनी ‘अमेरिका-चीन’ व्यापारयुद्ध तीव्र झाल्यास चीनच्या अर्थव्यवस्थेला ०.३ टक्क्यांच्या घसरणीचा फटका बसेल, असे भाकित वर्तविले होते.

English हिंदी

 

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info