चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यांचा पराभव करून मालदीवच्या निवडणुकीत लोकशाहीवादी शक्तींचा विजय

चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यांचा पराभव करून मालदीवच्या निवडणुकीत लोकशाहीवादी शक्तींचा विजय

माले – चीनधार्जिणे धोरण स्वीकारणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. विरोधी पक्षनेते इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना या निवडणुकीत मिळालेले यश म्हणजे लोकशाहीवादी शक्तींचा विजय ठरतो, असे सांगून भारताने या निकालाचे स्वागत केले आहे. अमेरिकेनेही या निवडणूक निकालाचे स्वागत केले असून सोलिह यांचे अभिनंदन केले आहे. या निकालामुळे हिंदी महासागर क्षेत्रात चीनला आणखी एक धक्का बसल्याचे दिसते.

मालदीव, निवडणूक, इब्राहिम मोहम्मद सोलिह, अब्दुल्ला यामिन, लोकशाहीवादी शक्ती, पराभव, world war 3, चीन, कर्जाचा फास मालदीवच्या निवडणूक आयोगाने सोलिह यांच्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाल्याचे घोषित केले. त्यांच्या विजयाचा निकाल घोषित झाला असला तरी सध्या मालदीवची सत्ता हाती असलेले राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन काय करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हुकूमशाही वृत्तीच्या या नेत्याच्या मागे चीनने आपले पाठबळ उभे केले आहे. त्याचा वापर करून यामिन यांनी मालदीवची सत्ता हस्तगत केली होती. काही महिन्यांपूर्वी आपल्या विरोधात निकाल देणार्‍या न्यायाधिशांनाही राष्ट्राध्यक्ष यामिन यांनी ताब्यात घेतले होते. मात्र या निवडणूक निकालानंतर यामिन यांनी आपला पराभव मान्य केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.

राष्ट्राद्यक्ष यामिन यांनी मालदीवमधील पायाभूत सुविधांच्या विकासप्रकल्पांसाठी चीनकडून भरमसाठ कर्ज घेतले आहे. या कर्जाचा फास लवकरच मालदीवच्या गळ्याभोवती आवळला जाईल व मालदीवची बंदरे व मोक्याची ठिकाणे चीनच्या ताब्यात जातील, अशी चिन्हे दिसत होती. हिंदी महासागर क्षेत्रातील महत्त्वाचा देश असलेल्या मालदीवमध्ये चीनचे अशारितीने वर्चस्व प्रस्थापित होणे, भारतासाठी धोकादायक ठरू लागले होते. मालदीवचे भारताबरोबरील परंपरागत मैत्रिपूर्ण धोरण बदलून राष्ट्राध्यक्ष यामिन यांनी चीनला अनुकूल धोरणे स्वीकारली होती. म्हणूनच भारताने लष्करी हस्तक्षेप करून मालदीवच्या जनतेची यामिन यांच्या हुकूमशाही राजवटीपासून सुटका करावी, अशी मागणी या देशाचे नेते करीत होते.

मात्र भारताने मालदीवमध्ये लष्करी हस्तक्षेप केल्यास, त्याचे पडसाद उमटतील, अशी धमकी चीनने दिली होती. पण भारताने मालदीवमध्ये लष्करी हस्तक्षेपाची शक्यता नाकारली होती. त्या पार्श्‍वभूमीवर सोलिह यांचा हा विजय मालदीवला पुन्हा लोकशाहीच्या दिशेने नेणारा असून यामुळे भारताला फार मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info