इटलीला घुसखोर निर्वासितांपासून सुरक्षित ठेवणार्‍या कठोर कायद्याला मंजुरी

इटलीला घुसखोर निर्वासितांपासून सुरक्षित ठेवणार्‍या कठोर कायद्याला मंजुरी

रोम – इटलीत घुसणार्‍या अवैध निर्वासितांची हकालपट्टी सुलभ करणार्‍या तसेच आश्रय देण्यात आलेल्या निर्वासितांचे नागरिकत्त्व काढून घेण्याची तरतूद असणार्‍या कठोर कायद्याला इटली सरकारने मंजुरी दिली आहे. इटलीचे पंतप्रधान गिसेप कॉन्ते व अंतर्गत सुरक्षामंत्री मॅटिओ सॅल्व्हिनी यांनी पत्रकार परिषदेत नव्या कायद्याची माहिती दिली. नवा कायदा इटलीला अधिक सुरक्षित करण्यासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे, अशा शब्दात अंतर्गत सुरक्षामंत्री सॅल्व्हिनी यांनी कायद्याचे समर्थन केले.

अवैध निर्वासित, कायद्याला मंजुरी, मॅटिओ सॅल्व्हिनी, निर्वासित, कारवाई, world war 3, expel illegal migrants, Italy, ऑस्ट्रियाइटलीत गेल्या काही वर्षात लाखो निर्वासित दाखल झाले असून त्याविरोधात जनतेतील असंतोष सातत्याने वाढतो आहे. यावर्षी झालेल्या निवडणुकीतही इटलीच्या जनतेने निर्वासितांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणार्‍या पक्षांना पाठिंबा देऊन निर्वासितांच्या लोंढ्यांविरोधातील नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर इटलीत स्थापन झालेल्या सरकारने गेल्या काही महिन्यात निर्वासितांच्या मुद्यावर अधिकाधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली असून नवा कायदा त्याचाच भाग मानला जातो.

नव्या कायद्यानुसार, इटलीत आलेल्या निर्वासितांसाठी देशात आश्रय मागण्याच्या व त्याबाबतीत असलेल्या निकषांमध्ये कठोर बदल करण्यात आले आहेत. निर्वासितांना आश्रय देण्याची प्रक्रिया सुरू असताना मोठ्या केंद्रात ठेवण्यात येणार असून यासंदर्भातील कालावधी तीन महिन्यांवरून सहा महिन्यांवर नेण्यात आला आहे. आश्रयासाठी अर्ज करणारा निर्वासित एखाद्या गुन्ह्यात सामील झाल्याचे आढळले किंवा सामजिकदृष्ट्या धोकादायक असल्याचे वाटल्यास त्याचा अर्ज तत्काळ रद्द करून हकालपट्टी करण्यात येणार आहे.

निर्वासितांच्या मुद्यावर स्थानिक महापालिका तसेच पोलिसांना अतिरिक्त अधिकार देण्यात आले असून घुसखोर निर्वासितांविरोधात पोलीस कोणत्याही दडपणाविना कारवाई करू शकतात. त्याचबरोबर दहशतवाद किंवा मोठ्या गंभीर गुन्ह्यात सहभाग आढळल्यास आश्रय देण्यात आलेल्या निर्वासिताचे नागरिकत्व रद्द करण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे.

‘निर्वासितांविरोधातील नव्या कायद्यामुळे इटलीला माफिया टोळ्या व मानवी तस्करी करणार्‍या गटांविरोधातील संघर्षात अधिक सहाय्य होणार आहे. त्याचवेळी निर्वासितांमुळे इटलीच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा अतिरिक्त ताणही कमी होईल. खोट्या निर्वासितांची हकालपट्टी, दहशतवाद्यांचे नागरिकत्त्व काढून घेणे यासाठीही नवा कायदा उपयुक्त ठरेल. नव्या कायद्याद्वारे इटलीत पोलिसांना अतिरिक्त अधिकार देण्यात आले आहेत’, अशा शब्दात इटलीचे अंतर्गत सुरक्षामंत्री मॅटिओ सॅल्व्हिनी यांनी कायद्याचे समर्थन केले.

सत्तेवर आल्यापासून निर्वासितांच्या घुसखोरीविरोधात कठोर भूमिका घेणार्‍या सॅल्व्हिनी यांनीच कायद्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही महिन्यात इटलीच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी देशाच्या किनारपट्टीवरून दाखल होणार्‍या अवैध निर्वासितांच्या लोंढ्याला आळा घालण्यात यश मिळविले होते. त्याचवेळी ऑस्ट्रिया व हंगेरीसारख्या देशांबरोबर युरोपात निर्वासितांविरोधातील आघाडी उभी करण्यासाठीही हालचाली केल्या होत्या.

English   हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info