माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, हिलरी क्लिंटन, जो बिडेन, जॉर्ज सोरोस यांना पाठवलेली स्फोटके म्हणजे ‘फॉल्स फ्लॅग’चा भाग असू शकतो – ट्रम्प समर्थकांचा आरोप

न्यूयॉर्क – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर गेली दोन वर्षे रिपब्लिकन नेते व समर्थकांना विविध पातळीवर लक्ष्य करणार्‍या घटना घडल्या आहेत. आत्ता ही अमेरिकेची मध्यावधी निवडणूक फक्त दोन आठवड्यांवर आली असताना स्फोटकांची घटना समोर येणे हे डेमोक्रॅट पक्षाने सहानुभूती मिळविण्यासाठी आखलेले कारस्थान असू शकते, असा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प समर्थकांनी केला आहे.

गेल्या ७२ तासांच्या अवधीत अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरासह वेगवेगळ्या भागांमध्ये ‘पाईप बॉम्ब’ व स्फोटके पाठविण्यात येण्याच्या जवळपास आठ घटना समोर आल्या आहेत. सोमवारी दुपारी अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्या न्यूयॉर्कमधील घरी एक संशयास्पद पॅकेज आले होते. या पॅकेजमध्ये सहा इंच लांबीचा ‘पाईप बॉम्ब’ आढळला होता.

त्यानंतर बुधवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, राष्ट्राध्यक्षपदाच्या माजी उमेदवार हिलरी क्लिंटन, माजी अ‍ॅटर्नी जनरल एरिक होल्डर, माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन, डेमोक्रॅट पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या माजी प्रमुख ‘वॅसरमन शुल्झ’, संसद सदस्य मॅक्झिन वॉटर्स यांच्या निवासस्थानीदेखील संशयास्पद स्फोटके पाठविण्यात आल्याचे समोर आले. वृत्तवाहिनी ‘सीएनएन’च्या न्यूयॉर्कमधील कार्यालयात पाठविण्यात आलेले पार्सल ‘सीआयए’चे माजी प्रमुख जॉन ब्रेन्नन यांच्या नावाने आल्याचेही उघड झाले.

स्फोटके, कारस्थान, डेमोक्रॅट पक्ष, पाईप बॉम्ब, आरोप, world war 3, अमेरिका, न्यूयॉर्क

गुरुवारी हॉलिवूड अभिनेता ‘रॉबर्ट डी निरो’ यांच्या न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंटमध्येही संशयास्पद स्फोटकांचे पार्सल आल्याची माहिती समोर आली आहे. एकामागोमाग पाठविण्यात आलेल्या या स्फोटकांच्या घटनांनी अमेरिकेत जबरदस्त खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्य्रू कुआमो यांनी शहराच्या विविध भागात पाठविण्यात आलेली स्फोटके हे दहशतवादी कृत्य असल्याचा दावा केला आहे.

डेमोक्रॅट पक्षाने स्फोटकांच्या मुद्यावरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या माजी उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी, अमेरिकेत फूट पडल्याचा ठपका ठेवून याविरोधात सार्‍या अमेरिकेने एकत्र यायला हवे, असे आवाहन केले. त्याचवेळी आपला डेमोक्रॅट पक्षच अमेरिकेला एकसंघ ठेवू शकतो, असे सांगून मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला मतदान करण्याचे आवाहन क्लिंटन यांनी केले. त्यांच्या या विधानांचा दाखला देऊन सदर बॉम्बप्रकरण म्हणजे ट्रम्पविरोधी राजकीय कटाचा भाग असल्याचे आरोप सुरू झाले आहेत.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, स्फोटकांची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून आपले सरकार त्याचा पूर्ण तपास करून सूत्रधार शोधून काढेल, अशी ग्वाही दिली. हिंसा तसेच हिंसेच्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून माझे सर्वोच्च कर्तव्य अमेरिका सुरक्षित ठेवणे हेच असेल, असे ट्रम्प पुढे म्हणाले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info