ब्रिटनचे राजपुत्र विल्यम ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ बनणार – तयारीसाठी गुप्त बैठकी सुरू झाल्याचा माध्यमांचा दावा

ब्रिटनचे राजपुत्र विल्यम ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ बनणार – तयारीसाठी गुप्त बैठकी सुरू झाल्याचा माध्यमांचा दावा

लंडन – ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स यांची जागा घेण्याची तयारी ‘प्रिन्स विल्यम’ यांनी केली आहे. यासाठी प्रिन्स विल्यम यांच्या गोपनीय पातळीवर भेटीगाठी सुरू झाल्याची माहिती एका दैनिकाने दिली. अधिकृत पातळीवर याबाबतची माहिती प्रसिद्ध झालेली नाही. तसेच या दैनिकाने दिलेल्या वृत्ताला दुजोरा किंवा त्याचे खंडन ब्रिटनच्या राजघराण्याकडून करण्यात आलेले नाही. मात्र राजघराण्यात काही बदल होईल, असे संकेत मिळत आहेत.

‘प्रिन्स ऑफ वेल्स’, भेटीगाठी, प्रिन्स चार्ल्स, ब्रिटनचे राजपुत्र, चर्चा, ww3, लंडन, प्रिन्स विल्यम

ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही असली तरी अजूनही या देशात राजघराण्याचे अधिकार संपुष्टात आलेले नाहीत. म्हणूनच या  राजघराण्याशी निगडीत असलेल्या बातम्यांना ब्रिटन तसेच ब्रिटनच्या बाहेरही विशेष महत्त्व दिले जाते. ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ असलेल्या व ब्रिटनच्या राजघराण्याचे वारसदार मानले जाणार्‍या प्रिन्स चार्ल्स यांनी वयाची सत्तरी पूर्ण केली आहे. त्यांचे पुत्र असलेले प्रिन्स विल्यम 36 वर्षांचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून 92 वर्षांच्या महाराणी एलिझाबेथ यांनी   आपल्यावरील कामाची जबाबदारी प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स यांच्यावर सोपविली होती. पण आता प्रिन्स चार्ल्स यांची जाग प्रिन्स विल्यम घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ब्रिटनच्या एका दैनिकाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. सदर दैनिकातील राजघराण्याबाबतच्या बातम्या देणारे वार्ताहर निकोलस बायबर यांनी प्रिन्स चार्ल्स यांची जागा प्रिन्स विल्यम घेतील, असा दावा केला. यासाठी त्यांनी आधीपासूनच तयारी सुरू केली असल्याचे बायबर यांनी म्हटले आहे. प्रिन्स विल्यम सध्या महत्त्वाच्या भेटीगाठी घेत असून याबाबतची सारी माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे, असे बायबर यांचे म्हणणे आहे. गेल्याच महिन्यात प्रिन्स चार्ल्स यांच्या क्लेरेन्स हाऊस येथे त्यांची व प्रिन्स विल्यम यांची भेट झाली. या ठिकाणी झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाचे संकेत देणारी ठरते, असे बायबर यांनी आपल्या बातमीत म्हटले आहे.

या भेटीनंतरच चार्ल्स यांनी आपल्यावर असलेली प्रिन्स ऑफ वेल्सची जबाबदारी प्रिन्स विल्यम यांच्यावर सोपविण्याचा अधिकृत निर्णय घोषित केल्याचे सदर वृत्तात नमूद करण्यात आले आहे. तसेच प्रिन्स चार्ल्स यांनी आपल्या 70 व्या जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या समारोहात 2021 सालच्या एप्रिल महिन्यात मोठ्या जबाबदारीचे हस्तांतरण होणार असल्याची घोषणा प्रिन्स चार्ल्स यांनी केली होती. तसेच या हस्तांतरणाची तयारीही सुरू झाल्याचे सूचक वक्तव्य प्रिन्स चार्ल्स यांनी यावेळी केले होते.

दरम्यान, प्रिन्स विल्यम आपल्या वडिलांसारखे पुढची साठ वर्षे प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून कारभार करणार नाहीत, असा दावा बायबर यांनी केला आहे. लवकरच ते ब्रिटनचे राजे म्हणून पदभार स्वीकारू शकतील, असे बायबर यांनी आपल्या बातमीत म्हटले आहे.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info