रशियाच्या सायबरहल्ल्यात अमेरिकेचे ‘न्यूक्लिअर वेपन्स नेटवर्क’ हॅक – अमेरिकेच्या आघाडीच्या संकेतस्थळाचा दावा

वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाकडून करण्यात आलेल्या सायबरहल्ल्यात अमेरिकेच्या अण्वस्त्रांची जबाबदारी असलेले ‘नेटवर्क’ हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील ‘पॉलिटिको’ या आघाडीच्या वेबसाईटने हा दावा केला असून, ऊर्जा विभाग व ‘नॅशनल न्यूक्लिअर सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’च्या (एनएनएसए) कॉम्प्युटर नेटवर्क्सवर सायबरहल्ला झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिल्याचे म्हटले आहे. या विभागांनी संबंधित संसदीय समित्यांना यासंदर्भात जाणीव करून दिल्याचेही वृत्तात सांगण्यात आले. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या अर्थ व व्यापार विभागाच्या कॉम्प्युटर नेटवर्कवर मोठा सायबरहल्ला झाल्याचे उघड झाले होते.

nuclear weapons stockpilenuclear weapons stockpile

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील आघाडीची सायबरसुरक्षा कंपनी असणार्‍या ‘फायर आय’वर मोठा सायबरहल्ला झाला होता. या सायबरहल्ल्यासाठी ‘सोलरविंड्स’ या ‘सर्व्हर सॉफ्टवेअर’चा वापर करण्यात आल्याचे समोर आले होते. ‘फायर आय’ ही कंपनी अमेरिकेतील अनेक सरकारी विभागांमध्ये सायबर सुरक्षा व कॉम्प्युटर नेटवर्कशी निगडीत प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. या विभागांमध्ये ‘सोलरविंड्स’चाही मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे अमेरिकेतील गुप्तचर तसेच तपासयंत्रणांनी या दोन्हींचा वापर करणार्‍या सर्व सरकारी विभागांना सावधानतेचा इशारा दिला होता.

nuclear weapons stockpile, ‘न्यूक्लिअर वेपन्स नेटवर्क’, सायबरहल्ला, पॉलिटिको, कॉम्प्युटर नेटवर्क, हॅक, रशिया, अमेरिका, अण्वस्त्र, TWW, Third World Warया पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित कॉम्प्युटर नेटवर्क हॅक होण्याचे वृत्त खळबळ उडविणारे ठरले आहे. ‘पॉलिटिको’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशन’, ‘सँडिया नॅशनल लॅबोरेटरिज’, ‘लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी’, ‘द ऑफिस ऑफ सिक्युअर ट्रान्सपोर्टेशन, एनएनएसए’, व ‘रिचलँड फिल्ड ऑफिस’ या विभागांच्या नेटवर्कवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तरी या नेटवर्क्समधील महत्त्वाची व संवेदनशील माहिती हॅकर्सच्या हाती लागली नसल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे, असे ऊर्जा विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

मात्र ऊर्जा विभाग व अण्वस्त्रांशी संबंधित ‘एनएनएसए’च्या नेटवर्क्सवर झालेला सायबरहल्ला अमेरिकेच्या सुरक्षेशी निगडीत संवेदनशील यंत्रणा सुरक्षित नसल्याचे संकेत देणारा ठरतो. ‘एनएनएसए’कडे अमेरिकेतील सर्व अण्वस्त्रांच्या साठ्याची जबाबदारी असून आण्विक घटकांची वाहतूक तसेच आपत्कालिन स्थितीत प्रतिसाद देण्याचेही कार्य सोपविण्यात आले आहे. त्याचवेळी गेल्या आठवड्यात उघड झालेल्या सायबरहल्ल्याची व्याप्ती अजूनही लक्षात न येणे ही देखील अत्यंत गंभीर बाब ठरते, असे या क्षेत्रातील विश्‍लेषक तसेच तज्ज्ञांनी बजावले आहे.

अमेरिकेच्या ‘सायबरसिक्युरिटी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी’सह (सीआयएसए) ‘होमलँड सिक्युरिटी’, ‘एफबीआय’ व ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ हल्ल्याचा तपास करीत आहेत. या सायबरहल्ल्यांच्या मुद्यावर अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ची बैठकही घेण्यात आली आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अथवा व्हाईट हाऊसकडून या हल्ल्याबाबत अजूनही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, ‘सीआयएसए’ने हा सायबरहल्ला सरकारी विभागांसह खाजगी कंपन्यांच्या कॉम्प्युटर नेटवर्क्ससाठीही अत्यंत गंभीर धोका असल्याचा इशारा दिला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info