कोरोनाबाबतचे सत्य बाहेर येण्याच्या धास्तीने बिथरलेल्या चीनची अमेरिकेला अणुयुद्धाची धमकी

कोरोनाबाबतचे सत्य बाहेर येण्याच्या धास्तीने बिथरलेल्या चीनची अमेरिकेला अणुयुद्धाची धमकी

बीजिंग – ‘चीनने आपल्याकडील अण्वस्त्रांची संख्या इतक्या प्रचंड प्रमाणात वाढवावी की चीनशी युद्धाचा विचारही अमेरिकेचा थरकाप उडविल. तसे करूनच चीन आपल्या विरोधात आक्रमक डावपेच आखणार्‍या अमेरिकेला शांत ठेवू शकेल’, असा सल्ला चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने आपल्याच सरकारला दिला आहे. इतर देशांना इशारे, धमक्या देण्यासाठी चीनची कम्युनिस्ट राजवट ग्लोबल टाईम्सचा वापर करते. त्यामुळे या वर्तमानपत्राच्या संपादकाने केलेली ही मागणी म्हणजे अमेरिकेसह सार्‍या जगाला चीनने दिलेला नवा इशारा ठरतो.

जगभरात 35 लाखाहून अधिकजणांचे बळी घेणारी कोरोनाची साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्ध असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. या आरोपांना बळ देणारी माहिती माध्यमांमध्ये दररोज प्रसिद्ध होत आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावरील दडपण वाढले. म्हणूनच त्यांनी कोरोनाच्या उगमाचा तपास करून 90 दिवसात आपल्यासमोर अहवाल सादर करण्याचे आदेश अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना दिले आहेत. यामुळे चीनचे धाबे दणाणले असून त्यावर चीनने जोरदार आक्षेप नोंदविला. या तपासाचा अहवाल समोर येण्याआधीच आपण तो मानणार नाही, अशी भूमिका चीनने घेतली आहे. यामुळे चीनवरील संशय अधिकच वाढला आहे.

आपल्यावरील आरोप व त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेला प्रतिसाद तसेच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे तपासाचे आदेश यामुळे अस्वस्थ बनलेल्या चीनने आता युद्धखोरीची भाषा सुरू केली आहे. ग्लोबल टाईम्समधील आपल्या एका लेखात या वर्तमानपत्राचे संपादक हू शिजिन यांनी आपल्या सरकारला आण्विक सामर्थ्य वाढविण्याचा सल्ला दिला. चीनकडे अमेरिकेवर अणुहल्ला चढवू शकणारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत. आंतरखंडीय मारा करणारी डीएफ-41 क्षेपणास्त्रे व जेएल-2, जेएल-3 ही पाणबुडीतून दागता येणारी क्षेपणास्त्रे चीनच्या ताफ्यात आहेत. या क्षेपणास्त्रांबरोबरच चीनने आपल्याकडील अण्वस्त्रांच्या संख्येत झपाट्याने वाढ करायला हवी, अशी मागणी शिजिन यांनी केली.

सध्या अमेरिका चीनच्या विरोधात आक्रमक डावपेच आखत आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडील अण्वस्त्रांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढवून चीन अमेरिकेतील उच्चभ्रूंना धडकी भरवू शकतो. तसे करूनच चीनला अमेरिकेला मवाळ धोरण स्वीकारण्यास भाग पाडता येईल, असा दावा शिजिन यांनी केला आहे. आपला हा लेख शिजिन यांनी चिनी सोशल मीडियावरही प्रसिद्ध केला. याद्वारे चीन अमेरिकेसह आपल्या विरोधकांना कोरोनाबाबत कठोर भूमिका न स्वीकारण्याचा इशारा देत असल्याचे दिसते.

हिंदी  English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info